SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे मंगळवारी आयोजनपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहणमहाराष्ट्र दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात महाडायलिसीस सेवांचा विस्तारजिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून शेंडा पार्क परिसराची पाहणीडी. वाय. पाटील फार्मसीची अपेक्षा चित्रे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथमपुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे महाराष्ट्र दिनी वितरणप्रलंबित अत्याचार प्रकरणांचा वेळेत निपटारा करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडगोकुळ बाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच : भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटीलमहाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर शहर स्वच्छतेत सुधारणा न झाल्यास कारवाई : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

जाहिरात

 

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण

schedule29 Apr 26 person by visibility 93 categoryराज्य

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिवस समारंभ 1 मे रोजी साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ शुक्रवार, 1 मे रोजी सकाळी 8 वाजता छत्रपती शाहू स्टेडियम येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री  प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे.
          
मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी  दि. 1 मे रोजी सकाळी 7.15 ते 9 वाजेपर्यंतच्या दरम्यान ध्वजवंदनाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजवंदन समारंभ आयोजित करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 7.15 च्या पूर्वी  किंवा सकाळी 9 वाजल्यानंतर करावा.

        या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आई वडील यांनी उपस्थित रहावे. समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनीटे अगोदर उपस्थित रहावे. सुरक्षिततेच्या कारणास्तव कोणतीही पिशवी सोबत आणू नये, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes