मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा जिल्हा कार्यालयात २२ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन
schedule18 Jul 26 person by visibility 196 categoryसामाजिक
कोल्हापूर : राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर "सेवा, सुशासन व गरीब कल्याण" अभियानांतर्गत विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानाच्या अनुषंगाने दि. १९ ते २३ जुलै २०२६ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, या अभियानातून एक लाख रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हा उपक्रम महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
याच अभियानाचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी, कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने भाजपा जिल्हा कार्यालय, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे 22 जुलै रोजी सकाळी 10 ते 05 या वेळेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरामध्ये भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, युवा वर्ग तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी, कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.
रक्तदान हे श्रेष्ठदान असून, या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्यातून सेवा करण्याचा हा उपक्रम असून, सर्व नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा,असे आवाहनही करण्यात आले आहे.