पेठवडगावमध्ये दोन ठिकाणी घरफोडी. अठरा ते वीस लाखांचा ऐवज लंपास
schedule08 Dec 24 person by visibility 220 categoryगुन्हे
पेठवडगाव : येथील कोल्हापूर रोडवर गणेश मंदिरसमोर असणाऱ्या सचिन दत्तात्रय कदम यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून वीस तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम दोन लाख असा सुमारे अठरा लाखांचा ऐवज लंपास केला. तसेच दत्तनगर येथेही अशाच प्रकाराने सोने व रोख रक्कम लंपास करण्यात आली.
येथील कोल्हापूर रोडवर गणेश मंदिरसमोर सचिन दत्तात्रय कदम राहतात. पुणे येथे नातेवाईकांचे लग्न असल्याने ते शुक्रवारी दुपारी घराला कुलूप लावुन सहकुटुंब पुण्याला गेले होते. चोरट्यांनी सुमारे वीस तोळे सोन्याचे दागिने व सुमन कदम यांच्या पेन्शनचे काढून आणलेली दोन लाख रुपये इतकी रक्कम असा सुमारे सतरा ते अठरा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
दत्तनगर येथील बाबासो नामदेव पाटील हेही आपल्या कुटुंबियांसह परगावी गेले होते. चोरट्यानी तिजोरीतील चार ग्रॅमची अंगठी, सोन्याचे मणी व रोख रक्कम १७ हजार असा पाऊण लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.
घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन तपास सुरू केला. श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. याबाबत वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.