SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘गोकुळ’ च्या दूध उत्पादकांसाठी ‘हवामान निकषांधारित जनावरांची विमा योजना’ : चेअरमन नविद मुश्रीफसंभाजीनगर बस स्थानक च्या नूतन नामफलकावर कोल्हापूर नावाचा समावेश करावा; शहरभान'ची मागणीसावधान! कोल्हापुरात १६ मार्चपासून 'हेल्मेट' सक्ती; विना हेल्मेट टोल नाक्यावर 'नो एन्ट्री'जनगणनेचे काम अचूक असावे : जनगणना सहाय्यक निदेशक वीरेंद्र दीक्षितभाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक पक्षीय कामात सक्रिय, जिल्हास्तरीय युवा आघाडीची बैठक घेवून केली कामांची आखणीशासकीय वसतिगृह व स्वयंम योजनांचे प्रवेश वेळापत्रक जाहीरकोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई: 'सान्वीक वेल्थ'चा मुख्य सूत्रधार ४ वर्षांनंतर गजाआड!तोंडातील बुरशीजन्य संसर्ग रोखणारे जेल विकसित; डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संशोधकांचे यशसमाजकार्याचा प्रत्येक विद्यार्थी शाश्वत विकासाचे बीज: सिद्धार्थ शिंदेबोगस जात दाखल्यांविरोधात कोल्हापुरात ९ मार्चला 'संघर्ष महामोर्चा'; अनुसूचित जातीच्या हक्कांवर गदा आणणाऱ्यांना दणका देण्याचा निर्धार!

जाहिरात

 

भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक पक्षीय कामात सक्रिय, जिल्हास्तरीय युवा आघाडीची बैठक घेवून केली कामांची आखणी

schedule04 Mar 26 person by visibility 137 categoryराजकीय

कोल्हापूर : भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी जिल्हास्तरीय युवा आघाडीची बैठक घेतली. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी, सदस्य नोंदणी केली जाणार आहे. तसेच नजीकच्या काळातील विविध उपक्रमांची आखणी करून, पक्षीय कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी युवा कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत केले.
भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी कृष्णराज महाडिक यांची निवड झाली आहे.

 कृष्णराज महाडिक यांनी आपल्या पक्षाच्या कामकाजाला प्रारंभ केला. कोल्हापुरातील भाजप कार्यालयात कृष्णराज यांनी भाजप युवा मोर्चाची जिल्हा स्तरीय बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष विश्‍वजीत पवार, प्रशांत बुगले, रविश पाटील-कौलवकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी येत्या काही दिवसात, युवा मोर्चाच्या वतीने राबवण्यात येणार्‍या उपक्रमांची माहिती दिली. त्यामध्ये युवा मोर्चाची कार्यकारिणी आणि संघटनात्मक बांधणी बळकट करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. शिस्तबध्द पक्ष या भाजपच्या प्रतिमेला तडा जाता कामा नये, असे सांगून राज्यात किमान एक लाख युवा सदस्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये १५ ते २० हजार सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट कोल्हापूर जिल्हयाला देण्यात आले. युवतींसाठी युवा मोर्चाचा स्वतंत्र विभाग सुरू करावा, रोजगार आणि क्रीडा कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा, अशा त्यांनी सुचना केल्या. तसेच येत्या मे महिन्यात युवा आघाडीचा राज्यस्तरीय कार्यक्रम कोल्हापुरात घेण्यात येईल. त्याचे नियोजन मार्च महिन्यापासून केले जाईल, असे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. 

यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विश्‍वजित पवार यांनी सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट पूर्ण केले जाईल, असा शब्द प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांना दिला. विरोधकांकडून नेहमीच केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार विरोधात खोटे नरेटीव्ह सेट केले जाते. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रशांत बुगले यांनी दिला. नूतन युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात युवा शाखा उघडण्यात येतील. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातील, अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष रविश पाटील-कौलवकर यांनी दिली. प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी घेतलेल्या पहिल्याच बैठकीमुळे कार्यकर्ते-पदाधिकारी चार्ज झाल्याचे दिसून आले. यावेळी वल्लभ देसाई, अनिकेत अतिग्रे, विवेक राजवर्धन यांच्यासह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes