टीईटी परीक्षा अनुषंगाने काही आक्षेप असल्यास 21 जानेवारीपर्यंत नोंदवण्याचे आवाहन
schedule19 Jan 26 person by visibility 75 categoryराज्य
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025 चे पेपर क्र. 1 व पेपर क्र. 2 ची अंतिम उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर 12 जानेवारी रोजी प्रसिध्द झाली.
पेपर क्र. 1 व पेपर क्र. 2 साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवार, परीक्षार्थ्यांचा अंतरिम निकाल 26 जानेवारी रोजी http://mahatet.in या संकेतस्थळावर उमेदवार, परीक्षार्थ्यांच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन पद्धतीने सायंकाळी 6 वाजल्यापासून पाहता येईल. अंतरिम निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी किंवा आक्षेप असल्यास http://mahatet.in या संकेतस्थळावर 21 जानेवारी रोजी सांयकाळी 6 वाजेपर्यंत उमेदवार, परीक्षार्थीना लॉगीनमधून ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदवू शकतील.
अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयामार्फत पत्रकाव्दारे कळविण्यात आली.