SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मेरीट स्कॉलरशिपमुळे विद्यार्थ्यांना आत्मसन्मान व नवी उर्जा : डॉ. वेदप्रकाश मिश्रा; डी. वाय. पाटील ग्रुपमधील २३० विद्यार्थ्यांना ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप’ प्रदान 'हिंद-दी-चादर'चा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा; विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे निर्देशवर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२६ साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना24 व 25 जानेवारीला नांदेड येथे शहीदी समागम; जगभरातील शिख बांधव समागमाला उपस्थित राहणारविद्यार्थ्यांतून ‘विचारदूत’ घडविण्याचा शासनाचा संकल्प ‘हिंद-दी-चादर’ २४ व २५ जानेवारीला नांदेडला देशव्यापी कार्यक्रमनवभारताचे उदात्त स्वप्न हा एन. डी. सरांचा ध्यास : कुलकर्णी जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणूक : निवडणूक विभागातून 1, निर्वाचक गणातून 1 नामनिर्देशपत्र दाखलगोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचा शिवसेनेत प्रवेशडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजनमुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ४५ हजार शासकीय निवासस्थाने; मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिपला मंजुरी

जाहिरात

 

'हिंद-दी-चादर'चा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा; विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

schedule18 Jan 26 person by visibility 49 category

🔹नाविन्यपूर्ण प्रसिद्धीवर भर द्या
🔹नांदेडमधील ऐतिहासिक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

नांदेड : शीख धर्माचे नववे गुरु 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या ऐतिहासिक 'शहीदी समागम' सोहळ्याचे विचार   खेडोपाडी आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचले पाहिजेत,असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले. 

येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी नांदेडमध्ये होणाऱ्या या भव्य सोहळ्याच्या प्रसिद्धी कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत पापळकर यांनी प्रसिद्धी यंत्रणेला मार्गदर्शन केले.गुरुजींचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पारंपरिक पद्धतींसोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर त्यांनी भर द्या, असेही ते म्हणाले.

 *शिक्षण विभागासह विविध माध्यमांचा प्रभावी वापर* कार्यक्रमाच्या व्यापक प्रसिद्धीसाठी शिक्षण विभागाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे श्री.पापळकर यांनी नमूद केले.शाळांच्या माध्यमातून प्रभात फेरी,निबंध,चित्रकला,प्रश्नमंजुषा आणि समूहगान असे उपक्रम राबवून विद्यार्थी व पालकांपर्यंत कार्यक्रमाचा संदेश पोहोचवावा.तसेच,शासकीय कार्यालये, पेट्रोल पंप आणि सार्वजनिक ठिकाणी होर्डिंग्ज लावून वातावरण निर्मिती करावी,अशा सूचना त्यांनी दिल्या.


▪️सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी नियोजनावर भर दिला.ते म्हणाले,की मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसोबतच सोशल मीडियाचा (समाज माध्यमे) प्रभावी वापर करून राज्यासह राज्याबाहेरही या कार्यक्रमाची माहिती पोहोचविणे आवश्यक आहे.

 ▪️१० लाख भाविकांची उपस्थिती; आंतरराष्ट्रीय महत्त्व 
हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिब जी शहीदी समागम राज्य समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक ऑनलाईन माध्यमातून म्हणाले,की हा कार्यक्रम देश-विदेश पातळीवर अत्यंत महत्त्वाचा आहे.या महासोहळ्यात केवळ शीख समाजच नव्हे,तर सिकलीगर,बंजारा,लबाना, सिंधी,मोहयाल,वाल्मिकी,उदासीन आणि वारकरी संप्रदायातील भगत नामदेव समाज आदी समाजासह इतर समाज असे मिळून सुमारे १० लाख भाविक सहभागी होणार आहेत.त्यामुळे प्रसिद्धीची व्याप्ती मोठी असावी.

या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर,शहीदी समागम समितीचे शासकीय समन्वयक डॉ. जगदीश सकवान,लातूर विभागाचे प्र.माहिती उपसंचालक विवेक खडसे आणि नांदेड-परभणीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, लातूर प्र.जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप,हिंगोली प्र.जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते  लातूर विभागाचे सहायक संचालक (माहिती) डॉ.श्याम टरके प्रत्यक्ष उपस्थित होते.

तसेच ऑनलाईन माध्यमातून हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिब जी शहीदी समागम राज्य समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे माध्यम समन्वयक संतोष आंधळे, छत्रपती संभाजीनगर माहिती विभागाचे प्र.उपसंचालक प्रशांत दैठणकर,जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने (छत्रपती संभाजीनगर),अरुण सूर्यवंशी (जालना),गोपाळ साळुंखे (धुळे), सुनील सोनटक्के (सोलापूर), डॉ. रवींद्र ठाकूर (जळगाव),विभागीय संपर्क अधिकारी श्रद्धा मेश्राम आणि छत्रपती संभाजी नगर विभागाचे सहायक संचालक गणेश फुंदे यांनी सहभाग नोंदविला.सर्व जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी आपापल्या जिल्ह्यातील प्रसिद्धी नियोजनाची सविस्तर माहिती सादर केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes