सांगलीमध्ये कृष्णा नदी पुलावरून कार कोसळली, तिघेजण ठार
schedule28 Nov 24 person by visibility 419 categoryगुन्हे
कोल्हापूर: सांगलीच्या अंकली येथील कृष्णा नदी पुलावरून भरधाव कार कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये तिघेजण ठार झाले. हा अपघात बुधारी रात्री एकच्या सुमारास घडला. घटनास्थळी स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलीसांनी धाव घेऊन जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व मृतदेह बाहेर काढण्यात आले.
दरम्यान लग्न सोहळा आटपून कोल्हापूरवरुन सांगलीकडे येताना गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट नदीपात्रात कोसळली या भीषण अपघातात तिघेजण ठार झाले. तसेच अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत.
या अपघातात सांगलीच्या पती-पत्नीसह तिघेजण जागीच ठार झाले. पती प्रसाद भालचंद्र खेडेकर, प्रेरणा प्रसाद खेडेकर, वैष्णवी संतोष नार्वेकर (वय 21 रा. आकाशवाणी केंद्र जवळ सांगली) अशी त्यांची नावे आहेत. समरजीत प्रसाद खेडेकर (वय 7), वरद संतोष नार्वेकर (वय 19) व साक्षी संतोष नार्वेकर (वय 42) सर्व रा. सांगली हे गंभीर जखमी झाले आहेत.