अंबप परीसरात "तभी तो दुश्मन जलते है, हमारे नामे # 302" पोस्ट चर्चेत, यश दाभाडे खून प्रकरणी आरोपींना अटक
schedule03 Dec 24 person by visibility 321 categoryगुन्हे
कोल्हापूर : वडगांव पोलीस ठाणे येथील यश दाभाडे खून प्रकरणातील गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक व एक विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांनी ही कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 02.12.2024 रोजी पाण्याचे टाकीजवळ अंबप, ता. हातकणंगले येथे यश किरण दाभाडे, वय 19 वर्षे, रा. साठे चौक अंबप यास सायंकाळी 6.45 वा. चे सुमारास पुर्वीचे वादाचे कारणावरुन हर्षद दाभाडे, रा.अंबप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर याने व त्याचे इतर साथीदारांनी मिळून एडक्यासारखे हत्याराने वार करुन गंभीर जखमी करुन ठार केलेबाबत वडगांव पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला.
तपासासाठी दोन पथके तयार करून मयताचे प्रेत मिळालेले ठिकाणचा परिसर तसेच आजुबाजुच्या परिसरातून माहिती घेवून तपास सुरु केला. तपासामध्ये मयत यश दाभाडे याने आरोपी हर्षद दाभाडे रा. अंबप यास सुमारे एक वर्षापुर्वी मारहाण केली होती. तेव्हापासून हर्षद दाभाडे हा मयत यश दाभाडे याचेवर चिडून होता. मयत यश दाभाडे हा अल्पवयीन असलेने तो थोड्याच दिवसात बालसुधारगृहातून सुटला. त्यानंतर त्यांचेत किरकोळ वाद होत असे. त्या कारणावरुनच आरोपी हर्षद दाभाडे व त्याचे इतर दोन मित्र असे तिघानी मिळून दि. 02.12.2024 रोजी पुर्वीचे भांडणाचे कारणावरुन मयत यश किरण दाभाडे हा अंबप येथील पाण्याचे टाकीजवळ बसले ठिकाणी एकाच मोटर सायकलवरून जावून एडक्या सारखे धारदार हत्याराने गंभीर स्वरुपात मारहाण करून त्यास ठार मारुन पळुन गेले होते.
आरोपीनी खुन करून गेलेनंतर आपले इंन्स्टाग्राम अकाऊंटवर "तभी तो दुश्मन जलते है, हमारे नामे # 302" अशी पोस्ट केली होती. त्यामुळे अंबप गांवासह परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. नमुद पथकाने तपासात त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच तांत्रीकदृष्टया तपास करुन आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अमंलदार हिंदुराव केसरे यांना माहिती मिळाली की, आरोपी हर्षद दाभाडे व त्याचे साथीदार हे विजय चौक वारणानगर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे येणार आहे. अशा मिळालेले माहितीचे आधारे तपास पथकातील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी विजय चौक वारणानगर कोल्हापूर येथे जावून आरोपी 01) हर्षद दिपक दाभाडे, वय 19, रा. माळवाडी, अंबप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, 02) शफीक उर्फ जोकर शौकत मुल्ला, वय 19, रा.राजे गल्ली आनंदनगर कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर तसेच एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना सापळा लावून ताब्यात घेतले. नमुद इसमांनी वडगांव पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 619/2024, बी.एन.एस. कलम 103(1), 3(5) प्रमाणे दाखल गुन्हयाची कबुली दिलेने त्यांना पुढील तपासकामी वडगांव पोलीस ठाणेचे ताब्यात दिलेले आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित, यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अमंलदार हिंदुराव केसरे, युवराज पाटील, समीर कांबळे, शिवानंद मठपती, संजय कुंभार, सागर माने, विजय इंगळे, संजय पडवळ, विनोद चौगुले, कृष्णात पिंगळे, विनोद कांबळे, यशवंत कुंभार, सुशिल पाटील व हंबीरराव अतिग्रे यांनी केले आहे.