कोल्हापूर महानगरपालिका : मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कार्तिकेयन एस यांच्याकडून विविध विभागांचा आढावा
schedule03 Dec 24 person by visibility 107 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कार्तिकेयन एस यांनी आज दुपारी महापालिकेच्या विविध विभागांचा आढावा घेतला. हि बैठक आयुक्त कार्यालयातील मिटींग हॉल मध्ये घेण्यात आली.
यावेळी प्रामुख्याने पवडी, नगररचना, मुख्य लेखा, घरफाळा, पाणी पुरवठा, अग्निशमन, वर्कशॉप, केएमटी, पर्यावरण, पंतप्रधान आवास योजना, आरोग्य विभाग व इतर विभागांचा त्यांनी आढावा घेतला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कार्तिकेयन एस यांनी नागरीकांना चांगल्या दर्जाच्या सेवा-सुविधा देण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे. स्वच्छतेच्या अनुषंगाने मी सकाळी फिरती करणार असून शहर दैनंदिन स्वच्छ ठेऊन चांगल्या दर्जाच्या सुविधा नागरीकांना देण्याच्या सूचना केल्या. दोन दिवसात प्रामुख्याने आरोग्य, पाणी पुरवठा व प्रकल्पांचा सविस्तर आढावा संबंधीत अधिकाऱ्यांसमवेत घेणार असलेचे सांगितले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, सहा.आयुक्त स्वाती दुधाणे, उज्वला शिंदे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, प्रशासन अधिकारी आर व्ही कांबळे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चलावाड, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, एन.एस.पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, आर के पाटील, सुरेश पाटील, रमेश कांबळे, कामगार अधिकारी राम काटकर, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, विधी अधिकारी संदीप तायडे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, रचना व कार्यपध्दती अधिकारी प्रशांत पंडत, महिला व बालकल्याण अधिक्षक प्रिती घाटोळे, परवाना अधिक्षक अशोक यादव, एलबीटी अधिक्षक विश्वास कांबळे, ग्रंथपाल रत्नाकर जाधव, सहा.विद्युत अभियंता नारायण पुजारी उपस्थित होते.