SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला; थोडक्यात बचावलेअंबप परीसरात "तभी तो दुश्मन जलते है, हमारे नामे # 302" पोस्ट चर्चेत, यश दाभाडे खून प्रकरणी आरोपींना अटककोल्हापूर महानगरपालिका : मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कार्तिकेयन एस यांच्याकडून विविध विभागांचा आढावासाखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी; खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणीकल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याचा ऊसदर एकरकमी 3150 रूपये जाहीरमहापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवरील सुविधांची कोकण विभागीय आयुक्तांकडून पाहणीचिकोत्रा नदी भागामध्ये उपसाबंदी लागूजागतिक दिव्यांग दिनानिमित्त जनजागृती रॅली उत्साहातएड्स मुक्त जिल्हा म्हणून लवकरच कोल्हापूरची नवी ओळख निर्माण होईल : प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे; जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त रॅलीचे आयोजनउत्कृष्ट लघुउद्योजक जिल्हा पुरस्कारासाठी 31 डिसेंबरपूर्वी अर्ज करा

जाहिरात

 

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जनजागृती रॅली उत्साहात

schedule03 Dec 24 person by visibility 149 categoryराज्य

 कोल्हापूर : समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद (दिव्यांग विभाग) व कोल्हापूर शहरात असणाऱ्या सर्व प्रवर्गाच्या दिव्यांग शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांगाविषयी जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने बिंदू चौकातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे व जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्या हस्ते बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीराव फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यां साधना कांबळे, कार्यालयीन अधिक्षक  अमोल घुगे उपस्थित होते.

रॅलीमध्ये कर्णबधिर, मतिमंद, अंध व अस्थीव्यंग प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. रॅलीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या महापुरुषांच्या वेशभूषा धारण केल्या होत्या. तसेच विद्यार्थ्यांच्या हाती दिव्यांगाविषयी जनजागृती निर्माण करणारे फलक होते. ही रॅली बिंदू चौक, आयोध्या टॉकीज मार्गे दसरा चौक येथे आली. जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीमध्ये वि.म. लोहिया कर्णबधिर विद्यालय, चेतना विकास मंदीर, अंधशाळा, स्वयंम मतिमंद मुलांची शाळा व जिज्ञासा मंतिमंद मुलांची शाळा, हॅन्डीकॅप अस्थिव्यंग कार्यशाळा इत्यादी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes