प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या राज्यपालांचे कार्यक्रम
schedule25 Jan 26 person by visibility 72 categoryराज्य
मुंबई : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे राज्यातील जनतेला उद्देशून संदेश देणार आहेत.
हा संदेश उद्या, दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन प्रसारित केला जाईल. तसेच आकाशवाणी (अस्मिता वाहिनी) वरुन देखील हा संदेश सकाळी ९.०० प्रसारित केला जाईल.
मा. राज्यपालांचे आमंत्रितांसाठी प्रजासत्ताक दिन स्वागत समारंभाचे आयोजन उद्या दि. २६ सायंकाळी ५.०० वाजता लोक भवन, मुंबई येथे करण्यात आले आहे. हा समारंभ फक्त निमंत्रितांसाठीच आहे.