SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भाजपा महिला, युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जाहीर निषेधनाविन्याचा शोध घ्या : डॉ. रत्नाकर पंडित; ग. गो. जाधव अध्यासनात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहातशिक्षणशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ येथे माजी विद्यार्थी व पालक मेळावा उत्साहात कोल्हापुरात १५ मार्च रोजी 'विधी सेवा महाशिबिर'; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला तयारीचा आढावाए.एन.एम. प्रथम वर्ष शपथविधी समारंभ उत्साहात येत्या गुरुवारी 'इग्नाईट महाराष्ट्र' एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन“सत्यजित चषक २०२६”चा बादशहा एफसी (पुणे) मानकरीकागल बुद्धिबळ स्पर्धेत श्रेयस पाटील अजिंक्य.अद्विक विचारे उपविजेताउज्वल भविष्यासाठी टाकलेले प्रत्येक पाऊल 'काउंट' होते : प्रफुल्ल खचणे; केआयटी च्या पायोनियर या टेक फेस्टची यशस्वी सांगताकोरे डिप्लोमा संघाचे महिला बास्केटबॉल स्पर्धेत यश

जाहिरात

 

भाजपा महिला, युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जाहीर निषेध

schedule23 Feb 26 person by visibility 118 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : दिल्लीमध्ये भारत देशाच्या नेतृत्वात प्रतिष्ठित ग्लोबल AI समिटचे आयोजन करण्यात आले होते. जगभरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिष्ठित आणि नवीन विचाराचे लोक भारतात आले होते. भारत देशासाठी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण होता. परंतु या आनंदाच्या वेळी गुंड प्रवृत्तीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी समिटच्या ठिकाणी घुसखोरी करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.  

 

याच निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महिला मोर्चा व युवा मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जोरदार आंदोलन करण्यात आले.

 

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा धिक्कार असो, राहुल गांधीचे करायचे काय खाली डोके वर पाय, देशद्रोही राहुल गांधी माफी मागा अशा घोषणा देऊन चौक दणाणून सोडला.

 

यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव बोलताना म्हणाले, भारतामध्ये आयोजित करण्यात आलेल्या AI शिखर परिषदेला ८० हून अधिक देशाचे प्रतिनिधी उपस्थित होते सर्वांनी भारताच्या प्रयत्नांचे कौतुक केले पण कॉंग्रेसने गुंड प्रवृत्त्तीची लोक आणून भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार देशद्रोहा सारखा आहे. AI आणि नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची जगभर ओळख वाढत असताना काँग्रेसने अशा प्रकारचे वर्तन करणे अत्यंत चुकीचे आहे. झालेल्या प्रकाराचा भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने कॉंग्रेसचा जाहीर निषेध करतो.

 

यावेळी महिला मोर्चा अध्यक्षा माधुरी नकाते, मेघाराणी जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष विश्वजित पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महिला मोर्चा अध्यक्षा माधुरी नकाते, धनश्री तोडकर, संगीता खाडे, युवा मोर्चा अध्यक्ष विश्वजित पवार, नगरसेवक विशाल शिराळे, बबन मोकाशी, पूर्वा राणे, अर्चना कोराणे, नीलिमा पाटील, रेखा उगवे, दीपा ठाणेकर, माधुरी व्हटकर, सुशीला पाटील, संगीता मोरे, अशोक लोहार, भूषण कानकेकर, जयेश घरपणकर, पंकज बारड, निरंजन घाटगे, शिवानी पाटील, सीमा पालकर, अनिता ढवळे, रीमा पालनकर, तेजश्विनी पार्टे, अलका जावीर, रुपाली आगळे, अश्विनी वास्कर, सुजाता पाटील, शारदा पोटे, विशाखा कलशेट्टी, वंदना बंबलवाड, धीरज पाटील, अमेय भालकर, विवेक राजवर्धन, आदित्य पाटील, विकास माने, हर्षवर्धन पाटील ई. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes