इचलकरंजी शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा
schedule25 Apr 25 person by visibility 115 categoryसामाजिक

इचलकरंजी : अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया तर्फे इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांना महानगरपालिका क्षेत्रातील परिसरात मोकाट कुत्र्यांचा व जनावरांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा याबाबतचे निवेदन देण्यात आले. येत्या पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इचलकरंजी शहर मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीने गजबजलेला आहे . उद्योगधंद्याचे माहेरघर आहे या ठिकाणी सर्व प्रकारचे उद्योग असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार आहे. त्यामुळे सर्वत्र दाट नागरी वस्ती दिसून येते. शहरात वेगवेगळ्या प्रकारची बरीच मोकाटे जनावरे मुक्तपणे वावरत असतात परंतु आज अखेर त्यांच्यावर कसलीही उपाययोजना केलेली नाही . अशातच मोकाट कुत्र्यांनी तर मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला आहे. शहरांमध्ये बऱ्याच भागामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात वावर वाढलेला आहे. नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, पाठलाग करणे, चावणे असे प्रकार दिसून येतात. त्यामुळे नागरिकांना वावरताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. तरी याप्रश्नी त्वरित योग्य व ठोस कारवाई करावी. अन्यथा येत्या पंधरा दिवसात आपल्या दालनासमोर मोकाट कुत्र्यासह तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा फाउंडेशनतर्फे देण्यात आला आहे .
निवेदनावर अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी स्टेट डायरेक्टर सचिन देसाई, स्टेट डायरेक्टर संजय पाटील, जिल्हा डायरेक्टर प्रफुल्ल मळगे, राजेंद्र कुमार ऐनापुरे, विजय घोटणे डॉ. अर्जुन घटटे, आप्पासाहेब भोसले, शिवानंद कारदगे, संजय पोळ, संतोष शिंदे, समृद्धी देसाई, मनीषा घोटणे उमेश पारसे सहदेव कांदे, अभिजीत साळुंखे आदी उपस्थित होते.