SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चोपडाई देवी यात्रेनिमित्त जोतिबा मार्गावर पार्किंगला बंदीकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात अखंड भारताचा सुवर्णकाळ: स्वातंत्र्यदिन आणि आपल्या कर्तव्याची दिशासोमवारी ‘या’ कारणामुळे बालिंगा पंपिंग स्टेशन राहणार बंद!राज्य शासनाच्या विविध योजनांसह महापालिका स्वनिधीतून १६६ कोटी ९३ लाखांची रस्त्यांची कामे सुरूकोल्हापूर महानगर पालिका : बेकायदेशीर नळ कनेक्शन रितसर करण्यासाठी १० दिवसांची मुदत; त्यानंतर दंडात्मक व फौजदारी कारवाईदत्तवाडचे आरोग्यमंदिर लवकरच जनतेच्या सेवेत : आमदार यड्रावकर देवीदास मिसाळ, कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखलनवापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक खुपिरेच्या बलमीम विकास संस्थेच्या संचालकावर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन; सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांचा इशारा

जाहिरात

 

‘गोकुळ’ मध्ये सहकार सप्ताह उत्साहात साजरा

schedule06 Jul 26 person by visibility 404 categoryउद्योग

◼️वृक्षारोपण, सहकार विषयावरील व्याख्यानातून अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या आवाहनानुसार दि. २९ जून ते ६ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित सहकार सप्ताह तसेच दि.०४ जुलै रोजीचा आंतरराष्ट्रीय सहकार दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. भारत सरकारच्या "सहकारातून समृद्धी" या संकल्पनेला अनुसरून पर्यावरण संवर्धन, सहकाराची मूल्ये, कर्मचारी विकास आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबविण्यात आले.

  सहकार सप्ताहानिमित्त गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या प्रांगणात औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. गोकुळचे प्रशासक प्रदीप मालगावे व सागर बलकवडे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. तसेच गोकुळचे प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव, गोगवे, बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी या शीतकरण केंद्र व सॅटेलाईट डेअरी उदगाव (शिरोळ), पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी तसेच कागल येथील प्रकल्प परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

यावेळी प्रशासक सागर बलकवडे म्हणाले, "सहकार ही केवळ संस्था चालविण्याची संकल्पना नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे. सहकार सप्ताहानिमित्त राबविण्यात आलेले उपक्रम पर्यावरण संवर्धनाबरोबरच सहकाराची मूल्ये अधिक मजबूत करण्यास मदत करतील. भविष्यातही गोकुळच्या माध्यमातून असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील."

 सहकार सप्ताहानिमित्त संघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा.डॉ.अनिल कारंजकर यांचे "सहकार व्यवस्थापन व त्यापुढील आव्हाने" या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. बदलत्या काळात सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने, प्रभावी व्यवस्थापन, संस्थेची कार्यपद्धती आणि कर्मचारी यांची भूमिका याविषयी त्यांनी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. तसेच संस्था, सहकार आणि कर्मचारी यांच्यातील विश्वास व समन्वय अधिक मजबूत असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

 सहकार सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व उपक्रमांना अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वृक्षारोपण, मार्गदर्शनपर व्याख्यान या उपक्रमांच्या माध्यमातून सहकाराची मूल्ये अधिक बळकट करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही प्रभावीपणे देण्यात आला.

यावेळी संघाचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेचे प्रा.डॉ.अनिल कारंजकर, आनंद यादव, महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, संघाचे अधिकारी हिमांशू कापडिया, बाजीराव राणे, डॉ.दयावर्धन कामत, सुधाकर पाटील, डॉ. विजय मगरे, उदय पाटील, भरत मोळे, प्रताप पाटील, अमोल गडकरी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes