स्थानिक विकास निधीतून उचगावमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ, उचगावच्या सर्वागिण विकासासाठी १ कोटी रूपयांचा निधी देणार, खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाही
schedule25 Aug 26 person by visibility 187 categoryराज्य
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील उचगावमधील नागरिकांना चांगले रस्ते, पायाभूत सुविधा देण्यासाठी, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भाजपचे सदस्य प्रयत्नशिल आहेत. उचगावातील अंतर्गत रस्त्यांसह अन्य कामं पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य नामदेव वाईंगडे यांना १ कोटी रूपयांचा निधी देवू, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. उचगाव मध्ये रस्ते कामाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
करवीर तालुक्यातील उचगावचे जिल्हा परिषद सदस्य नामदेव वाईंगडे आणि पंचायत समिती सदस्य तानाजी कांबळे यांच्या स्वनिधीतून, १५ लाख रूपये खर्चुन अंतर्गत रस्ते केले जाणार आहेत. त्यामध्ये जय महाराष्ट्र ग्रुप ते क्लासीक ग्रुप पर्यंतचा रस्ता आणि एमटीएम मंगेश गल्ली या रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. त्याचा आज शुभारंभ झाला. त्यासाठी खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचे उचगावमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर खासदार महाडिक यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते रस्ते कामाचा शुभारंभ झाला.
स्थानिक विकास निधीतून उचगाव मध्ये कॉंक्रीटचे रस्ते होतील. त्यामुळे पुढील १५-२० वर्षे रस्त्याचा प्रश्न उद्भवणार नाही, असे सांगून, खासदार धनंजय महाडिक यांनी, केंद्रात, राज्यात, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता असल्यानं, निधी कमी पडू देणार नाही. वाईंगडे यांना १ कोटी रूपयांचा निधी देवून, उचगावचा चेहरामोहरा बदलला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तलहा मणेर, महालिंग जंगम यांनीही मनोगत व्यक्त करत, विकास निधीची मागणी केली. ग्रामपंचायत सदस्य रमेश वाईंगडे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी आणि एन डी ग्रुपचे कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.