कोरे अभियांत्रिकीत दोन आठवड्याचा प्राध्यापक विकास कार्यक्रम
schedule07 Sep 25 person by visibility 192 categoryशैक्षणिक

वारणानगर : वारणा विद्यापीठाचे अग्रणी महाविद्यालय, तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, वारणानगर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभाग आणि अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (AICTE) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ ते २० सप्टेंबर २०२५ या कालावधीत “स्टेट ऑफ द आर्ट ट्रान्सपोर्टेशन जिओटेक्निक्स फॉर हाय-स्पीड रेल अँड रोड सिस्टीम्स” या विषयावर दोन आठवड्यांचा प्राध्यापक विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात देशातील नामवंत तज्ज्ञ प्राध्यापक व संशोधक मार्गदर्शन करणार असून, सहभागी प्राध्यापकांना परिवहन अभियांत्रिकीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधनाच्या नव्या दिशा तसेच हाय-स्पीड रेल्वे व रस्ते व्यवस्थेतील भू-तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.
मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांमध्ये सुधांशु कुलकर्णी (स्वतंत्र तांत्रिक सल्लागार), डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, (महामार्ग तज्ञ सल्लागार व मुख्य कार्यकारी अधिकारी, वारणा शिक्षण मंडळ) डॉ. एम. एस. रणदिवे (माजी विभागप्रमुख, सीओईपी पुणे), श्री. एस. जे. भोसले (कमिशनर, मुंबई महानगरपालिका), कर्नल, डॉ. विनोद ससालट्टी (जनरल मॅनेजर, नम्म बेंगळुरू मेट्रो) आणि डॉ. रविराज मुलांगी (NIT, सुरतकल) यांचा समावेश आहे.
या उपक्रमाबाबत बोलताना संयोजक डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी (मुख्य कार्यकारी अधिकारी, वारणा विभाग शिक्षण मंडळ) म्हणाले की, “या कार्यक्रमामुळे प्राध्यापकांना परिवहन भू-अभियांत्रिकीतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळेल आणि त्यांच्या अध्यापन व संशोधनाची गुणवत्ता अधिक परिणामकारक होईल तसेच रस्ते व रेल्वे क्षेत्रातील संबंधित सरकारी अधिकारी, कंत्राटदार व संशोधक विद्यार्थी यांना फायदा होईल.”
या कार्यक्रमासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, आमदार डॉ. विनय कोरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी, प्रा. एन. एच. पाटील, कुलगुरू, डॉ. डी. टी. शिर्के, प्राचार्य, डॉ. डी. एन. माने, अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे, डॉ. डी. एम. पाटील विभागप्रमुख, स्थापत्य अभियांत्रिकी व डॉ. आर. व्ही. काजवे डीन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि प्रा. बी. आर. बागणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.