SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सीपी राधाकृष्णन भारताचे १५ वे उपराष्ट्रपती, ४५२ मते मिळवून निवडणूक जिंकलीगोकुळच्या भविष्यातील योजनाचा दूध उत्पादक व ग्राहक दोघांचाही होणार दुहेरी फायदा : नविन मुश्रीफभागीरथी पतसंस्थेची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत, पतसंस्थेचे संपूर्ण कामकाज डिजिटल, ऑनलाईन करण्यासाठी प्रयत्नशिल : अरूंधती महाडिक कल्याण - डोंबिवली मनपाच्या परीक्षेत 100 मीटर आवारात इलेक्ट्रॉनिक वस्तू बाळगण्यास बंदीवारणा विद्यापीठाचे पहिले कुलाधिकारीपदी एन. एच पाटील यांची नियुक्तीपोटनियम दुरुस्ती, महत्वपूर्ण विषयांना सभासदांची बहुमताने मंजुरी; ‘गोकुळ’ ची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण, खेळीमेळीत संपन्न प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या गौरवार्थ विद्यापीठात ११ सप्टेंबरपासून आंतरराष्ट्रीय परिषदकोल्हापूर जिल्ह्यात 23 सप्टेंबर पर्यंत बंदी आदेश लागूमोडी लिपी अभ्यासक्रमाला २२ सप्टेंबरपर्यंत प्रवेश नोंदविण्याचे आवाहनशिवाजी विद्यापीठ - बी.ओ.ए.टी. यांच्यात सामंजस्य कराराचे हस्तांतरण

जाहिरात

 

कोल्हापुरात 1569 आरोग्य शिबिरांतून 77 हजार नागरिकांची मोफत तपासणी

schedule08 Sep 25 person by visibility 249 categoryआरोग्य

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात कोल्हापूर जिल्ह्यात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या अनोख्या उपक्रमाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली 28 ऑगस्टपासून आतापर्यंत 1569 मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यात 77 हजार 118 नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला तर 4 हजार 504 रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपली. विशेष म्हणजे 10 हजार 352 नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्यात आले आणि 4 हजार 323 जणांनी अवयवदानाची नोंदणी केली असून हे अभियान संपूर्ण गणेशोत्सवात राबविण्यात आले आहे.

▪️मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग कोल्हापूर, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये आणि धर्मादाय रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहभागाने हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गणेश मंडळांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला असून, मंडपांजवळील शिबिरांमध्ये गणेशभक्त आणि स्थानिक नागरिकांची मोफत तपासणी केली जात आहे. या शिबिरांमधून उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग यांसारख्या आजारांचे लवकर निदान करुन रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करुन दिले जात आहेत.

 

गणेश मंडळांचा जनजागृतीत मोलाचा वाटा गणेश मंडळांनी बॅनर आणि पत्रकांद्वारे या उपक्रमाची व्यापक जनजागृती केली. परिणामी हजारो नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेतला. ही मोहीम केवळ तपासणीपुरती मर्यादित नसून, नागरिकांमध्ये सातत्यपूर्ण आरोग्य जागरुकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवते. केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहितीही नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे.

 

लोकाभिमुख उपक्रमाचा आदर्श
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने राबवलेला हा उपक्रम जनहिताचा उत्तम आदर्श ठरला आहे. गणेशोत्सवासारख्या सांस्कृतिक उत्सवाला आरोग्यसेवेची जोड देणारी ही अभिनव संकल्पना नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी मैलाचा दगड ठरत आहे.

🟨 संख्यात्मक तपशील 

▪️ 1,569 आरोग्य शिबिरांचे    

    यशस्वी आयोजन

▪️ 77,118 नागरिकांची मोफत 

     आरोग्य तपासणी

▪️4,504 रक्तदात्यांचा सहभाग

▪️10,352 आयुष्मान भारत 

    कार्ड वितरित

▪️4,323 अवयव दान नोंदणी

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes