मौजे सरवडे ग्रामपंचायतीला भाडेपट्ट्याने 200 चौ.मी. जागा सुशोभीकरणासाठी मंजूर; पालकमंत्र्यांच्या हस्ते आदेशाचे वितरण
schedule08 Sep 25 person by visibility 284 categoryराज्य

▪️दाजीपूर अभयारण्य प्रकल्पग्रस्तांबाबत उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन
कोल्हापूर : सरपंच तसेच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत मौजे सरवडे तालुका राधानगरी यांनी महाराष्ट्र सरकार हक्काची नगरभूमापन क्रमांक 201 मधील 200 चौरस मीटर जागा मिळण्याबाबत अर्ज केला होता. याबाबत तहसीलदार तसेच प्रांताधिकारी यांच्या ना हरकत प्रमाणपत्रानंतर 30 वर्षाच्या मुदतीने भाडेपट्ट्याने सुशोभीकरणासाठी जागा मंजूर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आज रोजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ग्रामपंचायतला आदेश वितरित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी विविध प्रलंबित कामकाजाबाबतचा आढावा घेतला.
या जागेच्या मोबदल्यात वर्षाला एक रुपया या नाममात्र भाड्यावर तीस वर्षांच्या भाडेपट्ट्याच्या मदतीने सरपंच, ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सरवडे यांना आदेशात नमूद अटी व शर्तीस अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.
दाजीपूर अभयारण्य प्रकल्पग्रस्तांबाबत उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे. यावेळी संबंधित गावातील प्रकल्पग्रस्त वनविभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. संबंधित प्रकल्पग्रस्तांनी याबाबतचे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे दिले होते.