कोरे अभियांत्रिकीचे प्रा. प्रदिप लोखंडे यांना पी.एच.डी. पदवी प्रदान
schedule08 Sep 25 person by visibility 552 category

वारणानगर : वारणा विद्यापीठ अंतर्गत अग्रणी संस्था तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त) महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापक प्रदिपकुमार विठ्ठलराव लोखंडे यांना शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर कडून पी.एच.डी. (इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग) पदवी प्रदान झाली आहे.
प्रा. लोखंडे हे इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात अनुभवी प्राध्यापक असून, त्यांनी “डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ कॉम्पॅक्ट मल्टीलेयर वीएरेबल अँटिना विथ इम्पृव्ह परफॉर्मन्स फॉर डब्ल्यूबीएएन एप्लीकेशन” विषयावर संशोधनपर प्रबंध सादर केला. या संशोधन आधारित प्रा. लोखंडे यांना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिषदांमध्ये सर्वोत्कृष्ट पेपर पुरस्कार मिळाले आहेत.
संशोधनासाठी डॉ. युवराज कणसे व डॉ. सुहास पाटील (रिसर्च सेंटरः के. बी. पी. कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, सातारा) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे व श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी यांनी त्यांचे अभिनंदन केले. आपल्या संशोधनाचा उपयोग समाजाच्या आणि विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी करावा असा सल्ला डॉ. विनय कोरे यांनी दिला. अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, प्राचार्य डॉ. डी. एन. माने व विभागप्रमुख डॉ. एस. टी. जाधव यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.