SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी घेतले लालबागच्या गणेशाचे दर्शनउत्सव काळात फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ७ जणांचा मृत्यूडॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये गौरी गीते स्पर्धा उत्साहातकेंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेतले गणेशाचे दर्शनसारथी, उपकेंद्र, कोल्हापूर : एक विकासाचे आणि सशक्तीकरणाचे केंद्रकेआयटी च्या प्रथम वर्षाची सुरुवात ‘विशेष इंडक्शन’ ने संपन्न ; विविध मान्यवर व्यक्तींकडून विद्यार्थ्यांचे प्रबोधन खडतर परिश्रम घेऊन यशस्वी व्हा : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शनकाळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील भ्रष्टाचाराची शहानिशा करण्यासाठी एसआयटी चौकशी समिती नियुक्तची मागणी करणार कोल्हापुरातून सकल मराठा समाजातर्फे जीवनावश्यक वस्तू मुंबईस पाठवणारदूध उत्पादकांच्या श्रमामुळे ‘गोकुळ’ची प्रगती : नविद मुश्रीफ; गोकुळ दूध संघाची राधानगरी तालुका संपर्क सभा

जाहिरात

 

डी. वाय पाटील मेडिकल कॉलेज देशाच्या आरोग्य सेवेत मोठे योगदान : ॲडव्हायझर वृषाली पृथ्वीराज पाटील यांचे प्रतिपादन; मेडिकल कॉलेजचे ३६ व्या वर्षात पदार्पण

schedule12 Aug 24 person by visibility 633 categoryआरोग्य

 कोल्हापूर : देशाच्या आरोग्यसेवेत मोठे योगदान देणारे हजारो सक्षम डॉक्टर घडवणाऱ्या डी. वाय पाटील मेडिकल कॉलेजचा ३५ वर्षांची वाटचाल अतिशय अभिमानास्पद आहे. दर्जेदार वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून ज्ञानदानाचा आणि वैद्यकीय सेवेचा हा प्रवास यापुढे असाच ताकदीने सुरु राहिल अशी ग्वाही डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या ॲडव्हायझर वृषाली पृथ्वीराज पाटील यांनी दिली.

 १९८९ साली कसबा बावडा येथे स्थापन झालेल्या डी. वाय पाटील मेडिकल कॉलेजने सोमवारी 35 व्या वर्षात पदार्पण केले. या निमित्त कदमवाडी येथील डी. वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या सभागृहात वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन करण्या आले होते. यावेळी डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीच्या ॲडव्हायझर सौ. पूजा ऋतुराज पाटील व ॲडव्हायझर सौ वृषाली पृथ्वीराज पाटील, डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पूजा ऋतुराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते केक कापून वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी ३५ वर्षांची वाटचाल चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आली.

  यावेळी बोलताना वृषाली पाटील म्हणाल्या, पदमश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या आशीर्वादाने, कुलपती डॉ संजय डी. पाटील यांचा नेतृत्वाखाली महाविदयालयाची घोडदौड सुरु आहे.गेल्या 35 वर्षात महाविदयालयानने वैद्यकीय क्षेत्रात संस्काक्षम पिढी घडवण्याचे काम केले आहे. महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी आज देश-विदेशात भरातील नामांकित हॉस्पीटलमध्ये कार्यरत आहेत. मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या योगदानातून आज हे कॉलेज वेगळ्या उंचीवर पोहचले आहे. भविष्यात कॉलेजचा नावलौकिक वाढविण्यासाठी आपण सर्वजण असेच योगदान द्याल याची खात्री आहे.

   हॉस्पिटलच्या माध्यामातून जास्तीत जास्त गरजवंतापर्यत आरोग्यसेवा पोहचविण्याचे काम आमचे सहकारी कारत आहेत. डॉ. संजय डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षापासून हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना मोफत उपचार दिले जात आहेत. तसेच सर्व प्रकारच्या प्रसुती सेवा आणि औषधोपचार पूर्णपणे मोफत दिले जात आहे. मेडिकल कॉलेजचा ज्ञानदानाचा आणि वैदकीय सेवेचा हा वसा याहीपुढेही अधिक ताकदीने सुरु राहिल अशी ग्वाही वृषाली पाटील यांनी यावेळी दिली.  

  मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी प्रास्ताविकामध्ये मेडिकल कॉलेजच्या प्रगतीचा आढावा मांडला. येत्या काळात प्रतिभावंत वैदयकीय अधिकारी, कर्मचारी घडविण्यासाठी महाविद्यालय अविरत कार्यरत राहील. वैदयकीय उपचार व संशोधनाच्या क्षेत्रातही अधिक चांगले काम करण्याचा आमचा प्रयत्न रहील अशी ग्वाही त्यानी दिली.

     या 35 व्या वर्धापन दिनानिमित्त पूजा ऋतुराज पाटील व वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते प्रसूती विभागातील सर्व रुग्णांना फूड पॅकेटचं वाटप करण्यात आले. 

 कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. सुरुची पवार यांनी केले तर आभार वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांनी मानले. यावेळी डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदेचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक अभय जोशी, आयक्यूएसी डायरेक्टर डॉ. शिंपा शर्मा, मेडिकल कॉलेजच्या उपप्राचार्य डॉ. आशालता पाटील, उपअधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालाप्पा, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, सी.एच.आर.ओ श्रीलेखा साटम, उपकुलसचिव संजय जाधव, कृष्णात निर्मळ, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, स्कूल ऑफ इंजीनिअरिंगचे डायरेक्टर डॉ. अजित पाटील, नर्सिंग कॉलेज प्राचार्य डॉ. उमारणी जे., फार्मसी कॉलेज प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे, फ़िजिओथेरपी प्राचार्य डॉ. अमृत कुंवर रायजादे, हॉस्पिटलीटीचे प्राचार्य रुधीर बारदेस्कर, डॉ. आर. एस. पाटील, प्रोजेक्ट हेड सदानंद सबनीस यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, मेडिकल कॉलेजचे विभागप्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes