SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पश्चिम महाराष्ट्रात आरोग्यसेवा बळकट करणार : संपर्कप्रमुख प्रशांत साळुंखे; शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची बैठक संपन्नग्रंथोत्सवात जास्तीत जास्त प्रकाशक, ग्रंथविक्रेत्यांनी सहभागी व्हावे : जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकरडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ संघात निवडअण्णाभाऊ साठे समाज मंदिराचे काम पूर्ण करा : 'आप'ची मागणी सीपीआर मध्ये नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या समाज माध्यमावरील पोस्ट, बातमीवर विश्वास ठेऊ नका : जिल्हाधिकारी अमोल येडगे‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांना अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदानमाध्यमांनी बातमीस सनसनाटी स्वरुप देणे टाळावे : उपमुख्यमंत्री अजित पवारराष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करु नये : निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेलीसीपीआर मधील नोकरीसाठी कोणत्याही अमिषाला बळी पडू नका : अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे यांचे आवाहनतृतीयपंथी व्यक्तींनी ओळखपत्र मिळवण्यासाठी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा :जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

जाहिरात

 

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ संघात निवड

schedule22 Jan 25 person by visibility 171 categoryक्रीडा

कोल्हापूर  : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची विविध स्पर्धांसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली आहे.

महाविद्यालयाच्या  रणवीर काटकर व अथर्व पाटील हे पंजाब येथे होणाऱ्या अखिल भारतीय नेमबाजी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व करतील.  ओंकार चोपडे याची भोपाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय मलखांब स्पर्धेसाठी, सौरीष साळुंखे याची काश्मीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आईसस्टॉक स्पर्धेसाठी  सौख्या पाटील हिची जयपूर राजस्थान येथे होणाऱ्या अखिल भारतीय नेटबॉल स्पर्धेसाठी, तर अंकिता मुरगुडे हिची पश्चिम विभागीय भारत स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे.

विद्यापीठ संघात झालेल्या निवडीबद्दल प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, अधिष्ठाता डॉ. राहुल पाटील , क्रीडा संचालक इजाज गडकरी यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना डी. वाय. पाटील संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील व तेजस पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes