पश्चिम महाराष्ट्रात आरोग्यसेवा बळकट करणार : संपर्कप्रमुख प्रशांत साळुंखे; शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची बैठक संपन्न
schedule22 Jan 25 person by visibility 170 categoryआरोग्य
▪️ रुग्णांना घरपोच घरपोच आरोग्य सेवा
▪️प्रत्येक नागरिकाची वर्षातून एकदा मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी
▪️पश्चिम महाराष्ट्रात उपजिल्हा शासकीय रुग्णालयासाठी प्रयत्न करणार
▪️ वैद्यकीय योजनांचा प्रसार
▪️ सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करणार
▪️ एकनाथ हीरक आरोग्यवर्ष अंतर्गत महाआरोग्य शिबीर राबवणार
▪️ शिरोळ तालुक्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारणी बाबत प्रयत्न करणार
▪️ चंदगड तालुक्यात शासकीय रुग्णालय उभारणीसाठी प्रयत्न करणार
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या ६० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या' वतीने हे संपूर्ण वर्षे 'एकनाथ हिरक आरोग्यवर्ष' म्हणून साजरे केले जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत लहान मुलांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया, दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य वाटप, महाआरोग्य शिबिरांचे आयोजन, मोफत आरोग्य तपासणी, मोफत चष्मे वाटप, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आरोग्य संवाद यात्रा, वृक्ष लागवड आयोजन करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक संपन्न झाली.
याच बरोबर सदर बैठकीमध्ये अंबाबाई मंदिरतर्फे रुग्णांना आर्थिक मदत, शासकीय रुग्णालयात उत्तम दर्जाचे निदान आणि उपचार, रुग्णांना घरपोच घरपोच आरोग्य सेवा, प्रत्येक नागरिकाची वर्षातून एकदा मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी, पश्चिम महाराष्ट्रात उपजिल्हा शासकीय रुग्णालय, वैद्यकीय योजनांचा प्रसार, सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध करून देण्याबाबत, शिरोळ तालुक्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारणी, चंदगड तालुक्यात शासकीय रुग्णालय उभारणी या विविध विषयावर चर्चा झाली आणि याच्या पूर्णत्वासाठी अविरत प्रयत्न करणार असल्याचे संपर्कप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी आश्वासन दिले. यावेळी साळुंखे यांनी सामान्य नागरिकांचे आरोग्य विषयी समस्या तसेच पदाधिकाऱ्यांचे विविध प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी आपण कर्तव्यदक्ष असल्याचे सांगितले.
यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे विनायक जरांडे, मनमोहन खोत, धनश्री देसाई, अमरजाताई पाटील, फरीन मकूभाई, निलेश पाटील, संदीप देवण, विनायक जाधव, मनोज चौगुले, सातारा जिल्हाप्रमुख दिपक चव्हाण, कराड तालुकाप्रमुख महेश जमाले, क्रांतीकुमार पाटील यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.