SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
केईएम रुग्णालय मुंबईकरांचे आधारवड; रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; केईएम शताब्दी समारोहकोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात पेन्शन लोक अदालतीबाबत मार्गदर्शन संपन्नपश्चिम महाराष्ट्रात आरोग्यसेवा बळकट करणार : संपर्कप्रमुख प्रशांत साळुंखे; शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची बैठक संपन्नग्रंथोत्सवात जास्तीत जास्त प्रकाशक, ग्रंथविक्रेत्यांनी सहभागी व्हावे : जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकरडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ संघात निवडअण्णाभाऊ साठे समाज मंदिराचे काम पूर्ण करा : 'आप'ची मागणी सीपीआर मध्ये नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या समाज माध्यमावरील पोस्ट, बातमीवर विश्वास ठेऊ नका : जिल्हाधिकारी अमोल येडगे‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांना अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदानमाध्यमांनी बातमीस सनसनाटी स्वरुप देणे टाळावे : उपमुख्यमंत्री अजित पवारराष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करु नये : निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली

जाहिरात

 

ग्रंथोत्सवात जास्तीत जास्त प्रकाशक, ग्रंथविक्रेत्यांनी सहभागी व्हावे : जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर

schedule22 Jan 25 person by visibility 74 categoryराज्य

कोल्हापूर : महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिपत्याखालील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने कोल्हापूर जिल्हा ग्रंथोत्सव 2024 चे गुरुवार व शुक्रवार दिनांक 6 व 7 फेब्रुवारी 2025 या कालावधीत राजीव गांधी सांस्कृतिक भवन, कापड मार्केट समोर, थोरात चौक, इचलकरंजी येथे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवामध्ये जास्तीत जास्त प्रकाशक, ग्रंथ विक्रेते, ग्रंथालयांशी संबंधित विकसीत केलेल्या सॉफ्टवेअर कंपन्या, फर्निचर विक्रेते यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा ग्रंथोत्सव 2024 जिल्हा समन्वय समितीच्या सदस्य सचिव अपर्णा वाईकर यांनी केले आहे.

या ग्रंथोत्सवात दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ग्रंथोत्सवासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, जिल्ह्यातील मंत्री, सर्व लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, अनेक मान्यवर पदाधिकारी, सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी, कर्मचारी, इचलकरंजी शहरातील शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी तसेच इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या ग्रंथोत्सवात दिनांक 6 व 7 फेब्रुवारी या दोन दिवसांच्या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल तसेच ग्रंथालयांशी संबंधित सॉफ्टवेअर कंपन्या, ग्रंथालयाशी संबंधित फर्निचर विक्रेते यांचेही स्टॉल लावण्यात येणार आहेत. स्टॉल लावण्यासाठी इच्छुकांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, 2078, आकाशगंगा अपार्टमेंट समोर, राजारामपूरी 11 वी गल्ली, कोल्हापूर येथे लेखी पत्रासह दि. 28 जानेवारी 2025 पर्यंत संपर्क साधावा, असेही श्रीमती वाईकर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes