SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
इंधन बचतीसाठी महापालिकेचा पुढाकार; पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा इलेक्ट्रिक वाहनांना प्रतिसादभाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा बार्शी ते सोलापूर एस.टी. प्रवासभगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान विचारच मानवतेला तारतील : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादनडी. वाय. पाटील पॉलीटेक्निकतर्फे मंगळवारी डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शनकोणताही घटक शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाही : सभापती श्रद्धाताई गायकवाड हरोली व धरणगुत्तीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरजागतिक वारशाचे रक्षक: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनशक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या मंगळवारी सर्वपक्षीय एकवटणार, कसबा बावड्यात मेळावाकोल्हापूर : स्विमिंग पूलमध्ये बुडून दहावीतील विद्यार्थ्याचा अंतसार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

डी. वाय. पाटील पॉलीटेक्निकतर्फे मंगळवारी डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन

schedule18 May 26 person by visibility 89 categoryशैक्षणिक

▪️दहावीनंतरच्या करीअर संधी बद्दलही मार्गदर्शन 

कसबा बावडा : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्यावतीने 'दहावीनंतरच्या करिअर संधी आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया' याबद्दल मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित केली आहे. मंगळवार  (दि. १९ मे ) सकाळी १० वाजता कसबा  बावडा येथे पॉलिटेक्निकच्या सेमिनार हॉलमध्ये  ही कार्यशाळा होणार आहे.   यामध्ये विद्यार्थी आणि पालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले आहे.

   दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी हा टप्पा फार महत्त्वाचा ठरतो. दहावीनंतर नेमके कोणत्या क्षेत्रात जायचे? याबद्दल विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्याही मनात अनेक प्रश्न असतात. ही गोष्ट ध्यानात घेऊनच डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्यावतीने दहावीनंतरच्या करिअरच्या कोणकोणत्या संधी आहेत ? करिअर क्षेत्र कसे निवडावे ? याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याबरोबरच डिप्लोमा इंजीनियरिंग प्रवेश प्रक्रिया कशाप्रकारे होते प्रवेशासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते, शासनाच्या वतीने कोणकोणत्या स्कॉलरशिप दिल्या जातात, याबद्दलही कार्यशाळेत माहिती दिली जाणार आहे.

या कार्यशाळेमध्ये प्राचार्य डॉ. महादेव नरके, उपप्राचार्य प्रा. नितीन माळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes