SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
इंधन बचतीसाठी महापालिकेचा पुढाकार; पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा इलेक्ट्रिक वाहनांना प्रतिसादभाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा बार्शी ते सोलापूर एस.टी. प्रवासभगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान विचारच मानवतेला तारतील : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादनडी. वाय. पाटील पॉलीटेक्निकतर्फे मंगळवारी डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शनकोणताही घटक शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाही : सभापती श्रद्धाताई गायकवाड हरोली व धरणगुत्तीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरजागतिक वारशाचे रक्षक: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनशक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या मंगळवारी सर्वपक्षीय एकवटणार, कसबा बावड्यात मेळावाकोल्हापूर : स्विमिंग पूलमध्ये बुडून दहावीतील विद्यार्थ्याचा अंतसार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान विचारच मानवतेला तारतील : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

schedule18 May 26 person by visibility 91 categoryसामाजिक

◼️वझरे येथे नालंदा बुद्ध विहाराचे लोकार्पण उत्साहात     
          
वझरे : भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच मानवतेला तारतील, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या बुद्ध विहारातून समाजउपयोगी कार्यक्रम व्हावेत व अभ्यासिकेतुन मोठ - मोठे अधिकारी घडावेत, असेही ते म्हणाले.
        
वझरे ता. आजरा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या "नालंदा बुद्ध विहारचे" लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री  मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
            
मंत्री  मुश्रीफ  पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कुटुंबाचीही परवा न करता समाजासाठी फार मोठा त्याग केलेला होता. त्यांच्या असीम त्यागातूनच भारतीय संविधान निर्माण झाले. यामुळेच संपूर्ण भारत समानतेच्या एकाच धाग्यात गुंफलेला आहे.
            
▪️लोकप्रतिनिधी असा असावा......!
कॉम्रेड संपतराव देसाई म्हणाले, लोकप्रतिनिधी कसा असावा तर तो लोकांच्या अडीअडचणी गरजा ओळखून लोकाभिमुख काम करणारा असावा. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या रूपाने आपणा सर्वांना परिपूर्ण लोकप्रतिनिधी मिळालेला आहे. अलीकडच्या काळात वझरे गावाचा चेहरा मोहरा बदललेला आहे. यामध्ये मंत्री मुश्रीफ यांचे योगदान मोठे आहे. या मतदारसंघातील जनताही प्रागतीक विचाराची आहे, असेही ते  म्हणाले.
       
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिरीषभाऊ देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, काशिनाथ तेली, कॉम्रेड संपतराव देसाई, भंते अशकश्यपायन, बी . के . कांबळे , शशिकांत जाधव, सरपंच सौ. गुरव, विजयराव वांगणेकर, बापू निऊंगरे, युवराज येसणे, संजय केसरकर, शिवाजी पाटील, तुषार घोरपडे आदी प्रमुख उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes