SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
इंधन बचतीसाठी महापालिकेचा पुढाकार; पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा इलेक्ट्रिक वाहनांना प्रतिसादभाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा बार्शी ते सोलापूर एस.टी. प्रवासभगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान विचारच मानवतेला तारतील : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादनडी. वाय. पाटील पॉलीटेक्निकतर्फे मंगळवारी डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शनकोणताही घटक शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाही : सभापती श्रद्धाताई गायकवाड हरोली व धरणगुत्तीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरजागतिक वारशाचे रक्षक: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनशक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या मंगळवारी सर्वपक्षीय एकवटणार, कसबा बावड्यात मेळावाकोल्हापूर : स्विमिंग पूलमध्ये बुडून दहावीतील विद्यार्थ्याचा अंतसार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा बार्शी ते सोलापूर एस.टी. प्रवास

schedule18 May 26 person by visibility 101 categoryराजकीय

कोल्हापूर  : देशाचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण व सार्वजनिक वाहतुकीच्या वापराच्या आवाहनाला प्रतिसाद देत, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी आपल्या “युवा शक्ती जागर महाराष्ट्र दौऱ्या” दरम्यान, बार्शी ते सोलापूर हा प्रवास सर्व कार्यकर्त्यांसह राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसने केला.

केवळ भाषणांमधून नव्हे तर कृतीतून आदर्श निर्माण करण्याची परंपरा जपत, कृष्णराज महाडिक यांनी यापूर्वीही महाराष्ट्र दौऱ्यासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करून, पर्यावरणपूरक संदेश दिला होता. आज एस.टी.ने प्रवास करत त्यांनी साधेपणा आणि जनसामान्यांशी असलेली नाळ दाखवून दिली. तसेच राष्ट्रहितासाठी आवश्यक असलेल्या जबाबदारीची जाणीव कशी असावी, याचे उदाहरण राज्यातील युवकांसमोर ठेवले.

सामान्य नागरिकांप्रमाणे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून, त्यांनी इंधन बचत, प्रदूषण नियंत्रण आणि “विकसित भारत” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला बळ देण्याचा संदेश दिला. त्यांच्या या कृतीमुळे युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून,  पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असा प्रेरणादायी संदेश समाजात गेला आहे.

यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना कृष्णराज महाडिक यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन हे केवळ शासनाचे धोरण नसून, प्रत्येक भारतीयाने आपल्या जीवनशैलीत स्वीकारण्याची  जबाबदारी आहे. युवा मोर्चाचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक वाहतुकीच्या वापराबाबत जनजागृती करतील, असेही त्यांनी नमूद केले.

“युवा शक्ती जागर महाराष्ट्र दौरा” अंतर्गत राज्यभर युवकांशी संवाद, संघटन मजबुतीकरण आणि समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यात येत असून, कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाला युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes