SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पोर्टेबल ध्वनीशोषक चाचणी उपकरण तयार करण्यात संशोधकांना यशराज्य लॉटरीच्या जानेवारी महिन्यातील भव्यतम, मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीरडी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीरजनगणनेचे काम निर्धारीत वेळेत आणि अचूक करा; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देशआगामी विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निरीक्षकांचे प्रशिक्षणकुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) शोध मोहीम सुरू7 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात दोन हजाराहून अधिक आरोग्य पथके तैनातडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारपासून दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदतात्यासाहेब कोरे (डिप्लोमा) संघाची बी-1 झोन बास्केटबॉल स्पर्धेत बाजीशिक्षण, उद्योग आणि रोजगाराचा विकासमार्ग दाखविणारा अर्थसंकल्प: डॉ. केदार मारुलकर

जाहिरात

 

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

schedule05 Feb 26 person by visibility 80 categoryराज्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डी.एल.एड्. डिसेंबर २०२५ परीक्षेचे आयोजन ९ ते १७ डिसेंबर  २०२५ या कालावधीत करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर (www.mscepune.in) जाहीर करण्यात आला असून यामध्ये एकूण ७४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.
  डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेत सर्व माध्यमांचे एकूण ३६०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ३५६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर २६७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालात मराठी माध्यमामधील ७२.८३, उर्दूमधील ८०.०७, हिंदीमधील ८९.१९ तर इंग्रजी मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ७३.८७ इतके आहे.
  विद्यार्थ्यांना निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत यथावकाश हस्तपोच मिळेल. तसेच उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागणीसाठी विहीत नमून्यात, विहीत शुल्कासह २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करता येतील, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes