SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पोर्टेबल ध्वनीशोषक चाचणी उपकरण तयार करण्यात संशोधकांना यशराज्य लॉटरीच्या जानेवारी महिन्यातील भव्यतम, मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीरडी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीरजनगणनेचे काम निर्धारीत वेळेत आणि अचूक करा; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देशआगामी विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निरीक्षकांचे प्रशिक्षणकुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) शोध मोहीम सुरू7 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात दोन हजाराहून अधिक आरोग्य पथके तैनातडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारपासून दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदतात्यासाहेब कोरे (डिप्लोमा) संघाची बी-1 झोन बास्केटबॉल स्पर्धेत बाजीशिक्षण, उद्योग आणि रोजगाराचा विकासमार्ग दाखविणारा अर्थसंकल्प: डॉ. केदार मारुलकर

जाहिरात

 

7 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात दोन हजाराहून अधिक आरोग्य पथके तैनात

schedule05 Feb 26 person by visibility 76 categoryराज्य

  कोल्हापूर : जिल्ह्यात शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक पार पडत आहे. या मतदान प्रक्रियेदरम्यान मतदार, मतदान कर्मचारी आणि निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्यातील 2 हजार 691 बूथवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सेवा पुरवण्यात येत आहे. याकरिता सुमारे दोन हजार चार पथके तैनात करण्यात आली आहेत.

  जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर तातडीच्या उपचारांसाठी आवश्यक औषधांसह आरोग्य पथके उपलब्ध असतील. जिल्ह्यातील 81 प्राथमिक आरोग्य केंद्रे मतदानाच्या दिवशी 81 ॲम्बुलन्स 24 तास कार्यरत राहतील, जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ उपचार मिळतील. सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयी उपस्थित राहण्याच्या व कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येकाला वेळेत वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. सर्व पथकांना औषधसाठा आणि प्रथमोपचार कीट पुरवण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes