SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पोर्टेबल ध्वनीशोषक चाचणी उपकरण तयार करण्यात संशोधकांना यशराज्य लॉटरीच्या जानेवारी महिन्यातील भव्यतम, मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीरडी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीरजनगणनेचे काम निर्धारीत वेळेत आणि अचूक करा; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देशआगामी विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निरीक्षकांचे प्रशिक्षणकुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) शोध मोहीम सुरू7 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात दोन हजाराहून अधिक आरोग्य पथके तैनातडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारपासून दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदतात्यासाहेब कोरे (डिप्लोमा) संघाची बी-1 झोन बास्केटबॉल स्पर्धेत बाजीशिक्षण, उद्योग आणि रोजगाराचा विकासमार्ग दाखविणारा अर्थसंकल्प: डॉ. केदार मारुलकर

जाहिरात

 

राज्य लॉटरीच्या जानेवारी महिन्यातील भव्यतम, मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

schedule05 Feb 26 person by visibility 105 categoryराज्य

मुंबई: महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात ५ मासिक व ६ भव्यतम सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. जानेवारी २०२६ मध्ये महाराष्ट्र नाताळ नवीन भव्यतम सोडत, महाराष्ट्र सहयाद्री, महाराष्ट्र गणेश लक्ष्मी मकर संक्रांत विशेष, महाराष्ट्र गौरव, महाराष्ट्र तेजस्विनी व महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.
  दि. ७ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र नाताळ नवीन वर्ष भव्यतम या सोडतीमधून NY-05/2884 या महावीर लॉटरी सेंटर, कोल्हापूर व NY-07/4080 या श्री. सिद्धी समर्थ एजन्सी, दादर यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रु.२५ लाखाचे प्रथम क्रमांकाचे दोन बक्षिस जाहीर झाली आहेत.
  दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र गौरव या मासिक सोडतीमधून G-18/0879 या डायमंड कॉपोरेशन, बोरिवली यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रु.२७ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे.
  दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी या मासिक सोडतीमधून TJ-03/9661 या रॉयल एजन्सी, आंकली यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रु.२१ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस दुसरे बक्षिस रू. २ लाखाचे जैनी एजन्सी, घाटकोपर यांचेकडून जाहीर झाले आहे.
  तसेच महा. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम रू. ७ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एकूण ५ बक्षिसे जाहीर झाली आहेत.
  याशिवाय जानेवारी-२०२६ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून १२८८२ तिकीटांना रू. १,५६,६७,२००/- व साप्ताहिक सोडतीतून ५५,५४३/- तिकीटांना रू १,५८,५९,१००/- ची बक्षिसे जाहीर झाली आहेत.
  सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रू. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. १००००/- च्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes