SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पोर्टेबल ध्वनीशोषक चाचणी उपकरण तयार करण्यात संशोधकांना यशराज्य लॉटरीच्या जानेवारी महिन्यातील भव्यतम, मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीरडी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीरजनगणनेचे काम निर्धारीत वेळेत आणि अचूक करा; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देशआगामी विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निरीक्षकांचे प्रशिक्षणकुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) शोध मोहीम सुरू7 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात दोन हजाराहून अधिक आरोग्य पथके तैनातडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारपासून दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदतात्यासाहेब कोरे (डिप्लोमा) संघाची बी-1 झोन बास्केटबॉल स्पर्धेत बाजीशिक्षण, उद्योग आणि रोजगाराचा विकासमार्ग दाखविणारा अर्थसंकल्प: डॉ. केदार मारुलकर

जाहिरात

 

पोर्टेबल ध्वनीशोषक चाचणी उपकरण तयार करण्यात संशोधकांना यश

schedule05 Feb 26 person by visibility 109 categoryराज्य

शिवाजी विद्यापीठाच्या संशोधनास भारतीय पेटंट

कोल्हापूर : एखाद्या ठिकाणी बसविलेली ध्वनीयंत्रणा योग्य आहे किंवा नाही, याची पडताळणी करणारे सुवाह्य (पोर्टेबल) ध्वनीशोषक चाचणी उपकरण तयार करण्यात शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी यश मिळविले आहे. या संशोधनाला भारतीय पेटंट प्राप्त झाले आहे.

शिवाजी विद्यापीठाचे ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ. कल्याणराव गरडकर, जयसिंगपूर महाविद्यालयातील डॉ. संदीप साबळे व डॉ. रोहंत ढब्बे आणि इचलकरंजी येथील डी.के.टी.ई.एस. टेक्स्टाईल अँन्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या डॉ. चंद्रला जतकर या संशोधकांनी ‘पोर्टेबल साऊंड अॅबसॉर्प्शन टेस्टर’ हे उपकरण तयार केले आहे. व्यावसायिक ध्वनीयंत्रणेच्या ध्वनीशोषण क्षमतेच्या चाचणीसाठी सदर उपकरण अत्यंत उपयुक्त सिद्ध झाले आहे. आजपर्यंत एखादा रेकॉर्डिंग स्टुडिओ, रेकॉर्डिंग कक्ष, थिएटर, सभागृह इत्यादी ठिकाणी ध्वनीयंत्रणेसह ध्वनीशोषक यंत्रणा बसविल्यानंतर तिची क्षमता, ध्वनीशोषणातील अपेक्षित परिणामकारकता यासंदर्भात अनुभवातूनच चाचपणी केली जात आहे. तथापि, सदर उपकरणामुळे आता ध्वनीशोषण यंत्रणा बसविल्यावर लगोलग तिच्या क्षमतेची शास्त्रीय चाचणी करता येणे शक्य होणार आहे. अशा प्रकारचे हे उपकरण प्रथमच निर्माण करण्यात संशोधकांना यश मिळाले आहे.

ध्वनीशोषण करणाऱ्या पोर्टेबल शीट्स आणि पॅनल यांचा उपयोग मुख्यत्वे थिएटर, स्टुडिओ आणि व्होकल रेकॉर्डिंग कक्ष यांसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो. ध्वनीशोषक वापरल्यामुळे मायक्रोफोनभोवती येणारा प्रतिध्वनी (एको) शोषून रेकॉर्डिंगसाठी 'शांत' वातावरण तयार केले जाते. यामुळे अधिक स्वच्छ आणि अधिक व्यावसायिक व्होकल किंवा वाद्यांचा आवाज मिळविण्यास मदत होते. सदर पोर्टेबल ध्वनीशोषक चाचणी उपकरणाचा वापर आवाज नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध अॅबसॉर्बर उदा. छिद्र असणारे फोम, फायबर, फॅब्रिक, मेंम्ब्रेन, पॅनल, रेझोनंट अॅबसॉर्बर तसेच प्रतिध्वनी कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनीशोषकाची गुणवत्ता सुधारण्यासाठी होतो.

ध्वनीशोषक उपकरणाची कार्यप्रणाली

या पोर्टेबल ध्वनीशोषक चाचणी उपकरणाच्या कार्यपद्धतीची माहिती देताना डॉ. गरडकर म्हणाले, मानवी कानासाठीचा मानक श्रवणीय ध्वनी २० हर्ट्झ ते २० किलोहर्ट्झ स्पेक्ट्रम इतका आहे. या नव्याने शोधलेल्या ध्वनीशोषक चाचणी उपकरणामध्ये त्या दरम्यानच्या क्षमतेचे ध्वनीतरंग तयार करून चाचणी करावयाच्या ध्वनीशोषक वस्तूंवर प्रक्षेपित करून त्यावरुन परावर्तित केली जातात.  त्या वस्तूंकडून शोषले न गेलेले ध्वनीतरंग माइक्रोफोन (डिटेक्टर) द्वारे करंट / व्होल्ट स्वरुपात उपकरणाच्या स्क्रीनवर प्रदर्शित केली जातात. याद्वारे त्याठिकाणी ध्वनीशोषक यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वित आहे किंवा कसे, याविषयीचा अंदाज बांधून लगेच त्यावर उपयोजनही करणे शक्य होते. ध्वनीशोषण फॅब्रिकेशन क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संशोधकांसाठीही हे उपकरण उपयुक्त आहे. हे उपकरण सुवाह्य म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येतेच, त्याशिवाय ते कमी खर्चिकही आहे. ध्वनीयंत्रणा तपासणीच्या क्षेत्रात ते अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या पेटंटच्या प्राप्तीबद्दल शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी सर्व संशोधकांचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes