डीकेटीई मध्ये सहकारमहर्षी स्व. दत्ताजीराव कदम यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
schedule19 Nov 25 person by visibility 44 categoryसामाजिक
इचलकरंजी : कोल्हापूर जिल्हयाचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. दत्ताजीराव कदम यांचे स्मृतिदिनानिमित्त राजवाडयामध्ये डीकेटीईच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी डीकेटीईचे उपाध्यक्ष माजी मंत्री प्रकाश आण्णा आवाडे यांच्या हस्ते त्यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले.
यावेळी मानद सचिव डॉ सपना आवाडे, ट्रस्टी अनिल कुडचे, शेखर शहा यांच्यासह संचालिका प्रा डॉ एल एस अडमुठे, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.