डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनींनी जिल्हास्तरीय युवामहोत्सव स्पर्धेत लोकनृत्यामध्ये प्रथम क्रमांक
schedule16 Sep 25 person by visibility 58 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, इचलकरंजीच्या विद्यार्थ्यांनीनी शिवाजी विद्यापीठाच्या आयोजित जिल्हास्तरीय युवामहोत्सवमध्ये सहभाग घेवून लोकनृत्य विभागात उत्कृष्ट प्रदर्शन करीत प्रथम क्रमांक पटकविला आहे. शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि शिवराज महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने ४५ वा जिल्हास्तरीय युवामहोत्सव गडहिंग्लज येथे संपन्न झाला या स्पर्धेत डीकेटीईने उल्लेखन्नीय यश प्राप्त केले.
गडहिंग्लज येथे संपन्न झालेल्या लोकनृत्य स्पर्धेमध्ये डीकेटीईच्या विद्यार्थीनींनी गोवा राज्यातील समृध्द परंपरा दर्शिवणारे दिवली लोकनृत्य सादर केले. डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनींनी रंगतदार आणि बहारदार सादरीकरणामुळे परिक्षक व प्रेक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांक प्राप्त केला. या लोकनृत्याच्या स्पर्धेमध्ये जिल्हातील २० महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमठवला. यामध्ये प्रिती सपकाळ, अस्मिता जखाले, रिया निकम, क्रिती लोंढे, रितीका पवार, सानिका कोथवळे, राजनंदीनी गायकवाड, आदिती फरकाटे व वैष्णवी बुगड या विद्यार्थींनींचा सहभाग होता.
यश प्राप्त सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, ट्रस्टी डॉ ए.बी. सौंदत्तीकर, कार्यकारी संचालक रवी आवाडे यांच्या हस्ते झाला. विद्यार्थ्यांनींना संचालिका प्रा.डॉ.एल.एस.अडमुठे, डे.डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, सोशल डीन प्रा. एस.जी. कानिटकर, प्रा. जे.एस. रॉड्रीक्स, प्रा.एच.एस. दायमा यांचे मार्गदर्शन लाभले.