SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अंबप परीसरात "तभी तो दुश्मन जलते है, हमारे नामे # 302" पोस्ट चर्चेत, यश दाभाडे खून प्रकरणी आरोपींना अटककोल्हापूर महानगरपालिका : मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कार्तिकेयन एस यांच्याकडून विविध विभागांचा आढावासाखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी; खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणीकल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याचा ऊसदर एकरकमी 3150 रूपये जाहीरमहापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवरील सुविधांची कोकण विभागीय आयुक्तांकडून पाहणीचिकोत्रा नदी भागामध्ये उपसाबंदी लागूजागतिक दिव्यांग दिनानिमित्त जनजागृती रॅली उत्साहातएड्स मुक्त जिल्हा म्हणून लवकरच कोल्हापूरची नवी ओळख निर्माण होईल : प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे; जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त रॅलीचे आयोजनउत्कृष्ट लघुउद्योजक जिल्हा पुरस्कारासाठी 31 डिसेंबरपूर्वी अर्ज करामारकडवाडीतील बॅलेट पेपरवरील मतदान थांबवले, गाव प्रशासनाच्या दहशतीखाली; उत्तम जानकरांचे आरोप

जाहिरात

 

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे हॅकॅथॉन स्पर्धेमध्ये देशात अव्वल स्थान, दोन लाखाचे पारितोषिके प्राप्त

schedule30 Nov 24 person by visibility 165 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : गीक्स फॉर गीक्स आणि वलचर लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय स्तरावरील क्लाउड इन्व्होवेटीव्ह हॅकॅथॉन’ या स्पर्धेमध्ये डीकेटीईचे विद्यार्थी सुमित पडळकर, साहिल मुलाणी हे देशामध्ये अव्वल ठरले व दोन लाख रुपयाचे बक्षिस पटकावून त्यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय नोकरीसाठीच्या  इंटरव्हयुवसाठी संधी मिळवीली आहे इंटरव्हयूव पूर्ण केल्यानंतर दोघांना वलचर लि. या नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे .

गीक्स फॉर गीक्स आणि वलचर लि. यांनी आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय क्लाउड इन्व्होवेटीव्ह स्तरावरील हॅकॅथॉन’ या स्पर्धेमध्ये देशभरातील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी यांच्या मार्फत देण्यात आलेल्या विषयावर विद्यार्थ्यांनी आधुनिक संकल्पनेव्दारे त्यांच्या कल्पना शक्तीला वाव देत समाजोपयोगी प्रकल्प पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी भारतातून एकूण ५५० हून अधिक संघानी सहभाग नोंदवला होता. त्यानंतर ग्रँड फायनल मध्ये निवडक उत्कृष्ट टीमची निवड झाली होती यामध्ये डीकेटीईच्या बी.टेक. एआयडीएस इंजिनिअरींग मध्ये शिकत असलेले सुमित पडळकर व साहिल मुलाणी या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत भारतातून प्रथम येण्याचा मान पटकावला.

गीक्स फॉर गीक्स हे एक लोकप्रिय ऑनलाईन प्लॅटफॉर्म असून प्रामुख्याने कॉम्पुटर सायन्स, प्रोग्रॅमिंग आणि तंत्रज्ञानावर केंद्रित शैक्षणिक सामग्री प्रदान करते. विद्यार्थी, प्रोग्रामर आणि व्यावसायिक त्याचा वापर कोडिंग संकल्पना शिकण्यासाठी मुलाखातीची तयारी करण्यासाठी आणि तांत्रिक कौशल्य वाढवण्यासाठी मोठया प्रमाणावर करतात तसेच वलचर लि. ही क्लाउड इन्फ्रान्स्ट्रक्चर कंपनी आहे जी व्यवसाय आणि विकासांसाठी स्केलेबल आणि उच्च कार्यक्षमता क्लाउड कॉम्प्युटिंग सेवा देते. यांच्या द्वारे अयोजित केलेल्या हॅकेथॉन स्पर्धेत विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त कलागुणांना आणि प्रोग्रमिंग कौशल्यांना वाव देण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देते. स्केलेबल वेब ऍप्लीकेशन, प्रगत डेटा स्टोरेेज आणि एआय शक्तीवर चालणा-या सोल्यूएशन यांसारख्या डोमेनवर नाविण्यपूर्ण प्रोग्रॅमिंग कौशल्य विकसित करण्यासाठी या प्लॅटफॉर्म चा उपयोग होतो.

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे कौशल्य आणि नाविण्यपूर्ण उपयांसह देशातील सहभागी झालेल्या सर्व टीम्स मध्ये अव्वल स्थान पटकविले.

 डीकेटीईमध्ये नेहमी अशा पध्दतीच्या हॅकेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी उपलब्ध करुन देते या मध्ये यशस्वी होण्यासाठी येथील तज्ञ प्राध्यापकाकडून विविध प्रकारच्या ट्रेनिंग आणि प्रॅक्टीकलची तयारी करुन घेतली जाते.

 अभ्यासाव्यतीरिक्त इंडस्ट्रीला लागणा-या नविन टेक्नॉलॉजी संदर्भात कार्यशाळा आयोजित केल्या जातात त्यामुळेच डीकेटीईचे विद्यार्थी  देशभरात चमकतात.  
विद्यार्थ्यांचे डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी अभिनंदन केले तसेच इन्स्टिटयूटच्या संचालिका प्रा.डॉ. प्रा.डॉ. एल.एस.आडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे.पाटील, विभागप्रमुख एआयडीस डॉ टी.आय बागवान यांचे मार्गदर्शन लाभले.

 

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes