सरपंचांनी मांडल्या ग्रामविकासाच्या संकल्पना; दिलेल्या निवेदनाच्या पोहाेच पावतीची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी
schedule08 Nov 26 person by visibility 182 categoryराज्य
◼️गाळमुक्त धरण व जलयुक्त शिवार योजनेला सर्वोच्च प्राधान्य
◼️दुष्काळाचा सामना करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा
नागपूर : ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जी गावे मदत करतील त्यांना संपूर्ण सहकार्य देण्यात येईल, सरपंचांनी मांडलेल्या सर्व सूचना व जलसंधारणाच्या प्रश्नासंदर्भात प्राधान्याने कामे सुरू करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
लोहारी सावंगा येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधी सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला.
स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत संवाद साधताना नरखेड तालुक्यातील भिष्णूर च्या सरपंच श्रीमती लताताई बागडे यांनी, मुख्यमंत्री महोदयाना प्रथमच भेटत असल्याचे सांगताना गावातील विविध प्रश्न संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आणि निवेदन देताना मुख्यमंत्र्यांनाच मला निवेदनाच्या स्थळ प्रतिवर पोच द्यावी अशी मागणी केली. स्थानिक स्वराज्य संस्थातील लोकप्रतिनिधींनी थेट मुख्यमंत्र्यांना पोच पावती मागावी ही घटना प्रथमच घडत होती, परंतु त्या मागची भूमिका समजावून घेताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना पोच देण्याची सूचना यावेळी केली. सरपंच लताताई बागडे यांनी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाचा उल्लेख करताना जलसंधारणाच्या कामांमध्ये जी रिचार्ज शॉप बसविले आहेत त्याची योग्य नसल्याची मागणी केली, त्यासोबतच ग्रामस्थारावर होणाऱ्या विविध कामासंदर्भात ग्रामपंचायतीला कल्पना नसल्यामुळे आणि विकासाची कामे दर्जेदार व्हावीत यासाठी कंत्राटदारही एकच नसल्याची व्यथा व्यक्त केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामांबद्दल असलेल्या तळमळीचे भावना लक्षात घेऊन यापुढे असे घडणार नाही अशी ग्वाही दिली.
अटल भूजल ची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत तसेच नादुरुस्त कामांना दुरुस्तीसाठी निधी देण्यात यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी जागृतपणे काम करत आहेत गावात पिण्याचे पाणी गुरांच्या चारा व जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले.