SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : दुर्गम भागात दिवाळी साहित्य वितरणसरपंचांनी मांडल्या ग्रामविकासाच्या संकल्पना; दिलेल्या निवेदनाच्या पोहाेच पावतीची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणीडीकेटीई राजवाडयामध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त ‘स्वरदीपोत्सव- रंग गीताचे .. सूर वेणूचे‘ कार्यक्रमाचे आयोजनदिपावली: प्रकाशाचा आणि आनंदाचा महाउत्सवप्रकाशन विश्वातील प्रयोगशील, मार्गदर्शक दुवा निखळला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांना श्रद्धांजलीतारळे उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम जलद गतीने पूर्ण करा; मार्च महिन्यात लोकार्पणाचे नियोजन : पालकमंत्री प्रकाश आबिटकरगोकुळमधील शासननियुक्त सदस्यांच्या निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार!, भगवा चौकात शासनाच्या पुतळ्याचे दहन; सोमवारी २५ हजारांहून अधिक नागरिकांचा भव्य मोर्चा निघणारउदगावच्या कुंजवन जैन मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्तमुंबईच्या मेट्रोत वारणा ब्रँडचा विस्तार/गिरगाव स्थानकात विक्री केंद्राचे उदघाटनकोल्हापुरात फुलेवाडी रिंगरोडवरील सराफ दुकानात दरोड्याचा प्रयत्न; ४ तासांत आरोपी जेरबंद, १ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

जाहिरात

 

कोल्हापूर : दुर्गम भागात दिवाळी साहित्य वितरण

schedule08 Nov 26 person by visibility 128 categoryसामाजिक

कोल्हापूर : आपटे नगर ज्येष्ठ नागरिक संघ व उमाशंकर सेवा ट्रस्ट यांच्यावतीने शनिवारी (दि. ७) शाहूवाडी तालुक्यातील आळतुर येथील धनगरवाड्यावर ४० गरजू कुटुंबांना दिवाळी साहित्य व फराळ वाटप करण्यात आले.
या मध्ये लाडू, चिवडा, सुगंधी तेल, साबण, उटणे, पणत्या, आकाश कंदील व महिलांसाठी नवीन साड्या असे साहित्य देण्यात आले.

 स्थानिक कार्यकर्ते विठ्ठल येडगे व सखाराम येडगे यांच्या सहकार्याने व गावकऱ्यांच्या मदतीने साहित्य उतरवून वाटप करण्यात आले.

प्रास्ताविकात अध्यक्ष विनायक कुलकर्णी म्हणाले, "दुर्गम वाड्या-वस्त्यांवरील लोकांना दिवाळी साजरी करणे शक्य नसते, म्हणून गेली १५ वर्षे दरवर्षी एक धनगरवाडा निवडून हा उपक्रम राबविला जातो. दानशूरांच्या देणगीतून हे कार्य सुरू आहे. मुलांना चांगले शिक्षण व संस्कार मिळावेत, शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात हाही आमचा उद्देश आहे."

यावेळी उपाध्यक्ष डॉ. देवेंद्र रासकर, अशोक चौगुले, सुरेश खांडेकर, सुधीर कुलकर्णी, शैलजा धामणकर, सुरेखा डवर यांनी मार्गदर्शन केले. गावकऱ्यांनी आभार मानले.

त्यानंतर चनवाड येथील देवघर सेवाधाम आश्रमशाळेला भेट देण्यात आली. विनाअनुदानित, देणगीतून चालणाऱ्या या शाळेत ८० मुले शिकतात. सानिया बुचडे व योहान कांबळे यांनी सादर केलेल्या भजनाने सर्वांची मने जिंकली. भजनातून मिळणाऱ्या मानधनातून शाळा चालते, अशी माहिती चालक बुचडे यांनी दिली. सर्व सदस्यांनी आश्रमशाळेला यथाशक्ती देणगी दिली.

यावेळी उपाध्यक्ष डॉ देवेंद्र रासकर, सचिव शरद दिवाण, महादेव कुंभार, रमेश काळेबेरे, वृषाली कुलकर्णी, नेहाली दिवाण, अरुण कुलकर्णी, अमर पारगावकर, संदीप बकरे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes