विभागीय माहिती कार्यालय - संविधान दिन साजरा
schedule26 Nov 25 person by visibility 2 categoryराज्य
कोल्हापूर : कसबा बावडा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये कार्यरत असलेल्या विभागीय माहिती कार्यालय येथे आज संविधान दिन मोठ्या उत्साहात व श्रद्धापूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला.
विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) प्रवीण टाके यांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दर्शविलेल्या मार्गावरून सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मार्गक्रमण करावे असे आवाहन केले.
यावेळी सांगलीच्या जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती संप्रदा बिडकर, सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांच्यासह विभागातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.