कोल्हापूर भाजपकडून संविधान दिन उत्साहात; राष्ट्रनिर्माणात संविधानाचे महत्व अधोरेखित
schedule26 Nov 25 person by visibility 52 categoryराजकीय
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने भारतीय संविधान दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. ऐतिहासिक बिंदू चौकात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच यावेळी संविधान प्रतिमेचे पूजन देखील करण्यात आले. संविधानाचे सामूहिक वाचन करून लोकशाहीच्या पायाभूत तत्त्वांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, भारतीय संविधान हे केवळ एक कायदेशीर दस्तऐवज नसून ते देशाच्या आत्मा आणि लोकशाहीचे प्रतीक असल्याचे सांगितले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' या मंत्राला अनुसरून भाजप पक्ष संविधानाने घालून दिलेल्या मार्गावर चालत असल्याचे त्यांनी नमूद केले. सुशासन, पारदर्शकता आणि प्रत्येक नागरिकाच्या विकासासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यावर संविधान दिन आपण साजरा करत आहोत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा किताब देखील भाजपा सरकारच्या काळात देण्यात आला आहे. या उलट कॉंग्रेस राजवटीमध्ये आणिबाणी सारख्या अनेक गोष्टी घडल्या यातून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरु होते. त्यामुळे समाजातील सर्वात वंचित आणि दुर्बळ घटकांपर्यंत विकासाचे लाभ पोहोचवण्यासाठी भाजप पक्ष अविरत कार्यरत आहे.
याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, विराज चिखलीकर, अमर साठे, धनश्री तोडकर, माधुरी नकाते, रूपाराणी निकम, भरत काळे, हेमंत आराध्ये, विजय अग्रवाल, गणेश देसाई, अतुल चव्हाण, दीपक काटकर, रोहित पोवार, मंगला निपाणीकर, राजसिंह शेळके, विश्जीत पवार, अनिल कामत, महेश यादव, आजम जमादार, विशाल शिराळकर, कोमल देसाई, रविकिरण गवळी, सुनील पाटील, रीना पालनकर, सीमा पालकर, सरिता हारुगले, अलका जावीर, छाया साळुंखे, अश्विनी गोपुडगे, तेजस्विनी पार्टे, स्वाती कदम, किरण नकाते, भूषण कानकेकर, संग्राम निंबाळकर, अँड.मनोज कदम, मनोज औंधकर, अभिजित शिंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.