ग्रंथालयांच्या भवितव्याविषयी विद्यापीठात चर्चासत्र यशस्वी
schedule26 Nov 25 person by visibility 58 categoryराज्य
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभागामार्फत प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) या योजनेअंतर्गत “एआय इन द लायब्ररी: ट्रान्सफॉर्मिंग द फ्युचर ऑफ इन्फॉर्मेशन एक्सेस” या विषयावर दि. २४ व २५ नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय चर्चासत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
सदर चर्चासत्राचे उद्घाटन प्रमुख अतिथी डॉ. आर. पी. अडाव, ग्रंथपाल न्यू कॉलेज, कोल्हापूर यांच्या हस्ते व डॉ. डी. बी. सुतार, प्र. संचालक, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अधिविभागप्रमुख डॉ.एस .बी. पाटील यांनी केले.प्रमुख पाहुण्यांची ओळख सहयोगी प्राध्यापक डॉ. वाय. जी. जाधव यांनी करून केली. सहाय्यक प्राध्यापक व्ही. पी. गुरव यांनी आभार मानले.
दोन दिवसीय चर्चासत्रामध्ये साधन व्यक्ती म्हणून उपस्थीत असणारे डॉ. आर. पी. अडाव, डॉ. विलास जाधव, डॉ. सचिन माळी, श्री. विश्वास हसे आणि श्री. चेतन टाकसाळे यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा ग्रंथालयातील वापर’ या विषयावर उपस्थितांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. समारोप सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. पी. बी. बिलावर, उपग्रंथपाल, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी भूषविले.