कोलोली येथे "देव दिपावली" निमित्त दूध उत्पादकांना फरक बिलाचे वाटप
schedule19 Nov 25 person by visibility 64 categoryउद्योग
पन्हाळा : कोलोली (ता.पन्हाळा) येथे श्री विनयरावजी कोरे सहकारी दूध व्याव.संस्थेच्या वतीने "देव दिपावली" निमित्त दूध उत्पादकांना फरक बिलाचे वाटप आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) व खासदार धैर्यशील दादा माने यांच्या हस्ते करण्यात आले.
संपूर्ण देशात अश्विन कृष्ण चतुर्दशीला म्हणजेच नरक चतुर्दशीच्या दिवशी दिपावली थाटामाटात साजरी होते; पण पन्हाळा तालुक्यातील कोलोलीत मात्र ही दिपावली साजरी होत नाही. तर ती दिपावलीनंतर एक महिन्याने मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला गावची 'धाकटी देवदिवाळी' म्हणजे कोलोलीची गाडाईदेवी यात्रा साजरी केली जाते.
कोलोलीने बदलत्या काळातही ही परंपरा कायम ठेवली आहे. हे गाव गाडाईदेवीची 'देव दिवाळी' साजरी करते आणि मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा आणि द्वितीया या दोन दिवशी साजरी केली जाते. अर्थातच यंदा ही देव दिवाळी २१ व २२ नोव्हेंबरला होणार आहे.त्यानिमित्त संस्थेच्या वतीने दूध उत्पादकांना फरक बिलाचे वाटप आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कोलोली गावचे माजी सरपंच राजाराम पाटील, पन्हाळा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिता पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील, बळवंत पाटील (मास्तर), शिवाजी रावजी गायकवाड,प्रधान रंगराव पाटील, दगडू पाटील (आबा),दादासो पाटील,राजाराम पाटील, सज्जन पाटील,बाबासी पाटील , विजय बाऊचकर, सुनिल चौगुले,अरुण पाटील,उत्तम बळीराम धुमाळ,महादेव गुंडा पाटील,तानाजी बापू पाटील,विजय तातोबा खोत,प्रकाश पाटील,विकास पाटील यांच्यासह सर्व संस्थांचे पदाधिकारी,सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.