कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीत जिल्हा बँकेत ९ पैकी ३ जागा मिळावी अशी मागणी शिवसेनेने केली होती. मात्र सत्तारूढ गटाने ती अमान्य केली. तसेच सत्ताधारी गटाने भाजपला सोबत घेतल्याने शिवसेनेने सत्तारूढ साथ सोडून नव्या पॅनेलची घोषणा केली. असल्याचे यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी सांगितले.
सत्तारूढ गटाकडे ९ मधील तीन जागांची मागणी केली होती. दुधवडकर म्हणाले मी स्वतः सर्वांसोबत चर्चा केली होती. शिवसेनेच्या निवेदिता माने यांनी सत्तारूढ गटांची उमेदवारी स्वीकारल्याने शिवसेनेच्या गटाला धक्का बसला आहे. त्यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी आमच्या पॅनलमध्ये यावे अशी इच्छा आहे. आता ते काय निर्णय घेतात ? त्यावर अवलंबून आहे. असे दुधवडकर म्हणाले.
ही निवडणूक बिनविरोध व्हावी या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र सत्तारूढ गटाने भाजपला सोबत केल्याने आम्ही यातून बाहेर पडलो असे खासदार संजय मंडलिक म्हणाले. दरम्यान, शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी केली शिवसेनेच्या पॅनेलची घोषणा केली.
यावेळी संपत पवार-पाटील, माजी आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश अबीटकर, शिवेसना जिल्हाध्यक्ष विजय देवणे, मुरलीधर जाधव, माजी आमदार सत्यजित पाटील उपस्थित होते.
शिवसेनेचे पॅनेल
राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन आघाडी उमेदवार : - संजय सदाशिवराव मंडलिक, बाबासाहेब पंडितराव पाटील (असुर्लेकर), प्रा. अर्जुन अबीटकर, क्रांतीसिंह पवार पाटील, लतिका पांडुरंग शिंदे, रेखा सुरेश कुऱ्हाडे, उत्तम रामचंद्र कांबळे, विश्वास शंकर जाधव, रवींद्र बाजीराव मडके