मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयांची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली पाहणी
schedule09 Jan 25 person by visibility 224 categoryराज्य
कोल्हापूर : मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयास तसेच परिसराला भेट देऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पाहणी केली.
या भेटीदरम्यान त्यांनी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. कार्यालयीन स्वच्छता व बाह्य स्वच्छता तात्काळ करुन घ्यावी, असेही यावेळी निर्देश दिले. त्याचबरोबर प्रशासकीय इमारतीबाहेरील पार्कींग व्यवस्थेचे नियोजन, कार्यालयातील इतरत्र अस्ताव्यस्त असलेले सध्या वापरात नसलेले साहित्य नियमानुसार निर्लेखन करावे, जेणेकरुन कार्यालयातील परिसर स्वच्छ राहील, प्रशासकीय इमारत कामकाजाबाबत नेमलेल्या समितीने वेळोवळी बैठका घेऊन इमारतीतील कार्यालयाच्या अडीअडचणी जाणून घेऊन सोडविण्यात यावे.
यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण, कागल-राधानगरी उप विभागीय अधिकारी प्रसाद चौगुले आदी उपस्थित होते.