SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयांची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली पाहणीनिर्मितीक्षम वाचन पद्धतीचा वापर करणे गरजेचे: डॉ. सुनीलकुमार लवटेसावित्रीबाई फुले रुग्णालयातील मॅटर्निटी ऑपरेशन थिएटर, लेबररुम पाच दिवस राहणार बंदकोल्हापूर : 23 कनेक्शन खंडीत करुन रुपये 9 लाख 14 हजार 504 इतकी थकीत रक्कम वसुलदुधाळी येथील 6 द.ल.लि. क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र जानेवारी अखेरपर्यंत कार्यान्वीत करा : के.मंजूलक्ष्मीकोल्हापूर : घरफाळा थकबाकीपोटी 4 व्यावसायिक मिळकती सीलडीकेटीईमध्ये इस्त्रो आणि विज्ञान भारतीच्या संयुक्त विद्यमानाने आउटरिच प्रोग्रम उत्साहातशेतकऱ्यांनी ई पीक पाहणी अॅपव्दारे पिकांची नोंद 15 जानेवारी पर्यंत पूर्ण करा : जिल्हाधिकारी अमोल येडगेकोल्हापूर : लाईन बाजार परिसरात गस्त वाढवा : 'आप'चे पोलिसांना निवेदनमुस्लिम समाजातील पहिली शिक्षिका : फातिमा शेख

जाहिरात

 

कोल्हापूर : घरफाळा थकबाकीपोटी 4 व्यावसायिक मिळकती सील

schedule09 Jan 25 person by visibility 181 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना घरफाळा विभागामार्फत जप्ती नोटीस लागू करुन देखील काही मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे आज घरफाळा विभागीय कार्यालय क्र.2 अंतर्गत जोतिबा रोड परिसरामधील श्री.संत नरहरी सोनार सहकारी पतसंस्था (थकबाकीची रक्कम 6,14,823/-) विभागीय कार्यालय क्र.3 राजारामपूरी अंतर्गत राजारामपूरी 08 वी गल्ली येथील मोहिनी मोहनराव जाधव (थकबाकीची रक्कम 2,61,713/-),

 मुक्ताबाई म.पौडकर/मोहिनी मोहन जाधव (थकबाकीची रक्कम 70,706/-) व 10 वी गल्ली परिसरातील कडोलीकर (थकबाकीची रक्कम 3,50,489/-) अशा 4 व्यावसायिक मिळकत धारकांची रक्कम रु.12,97,731/- थकीत आहे. त्यामुळे या मिळकतींवर सीलची कारवाई करण्यात आली.

तरी शहरातील सर्व थकबाकीदारांना पुन:च जाहीर आवाहन करण्यात येते की, ज्यांनी अद्यापही आपला घरफाळ्याची थकीत रक्कम भरणा केलेली नाही. त्यांनी आपला थकीत घरफाळा भरुन महानगरपालिकेस सहकार्य करावे. अन्यथा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदी नुसार मिळकत सिल किंवा मिळकतीवर बोजा नोंद करण्याची कारवाई करण्यात येईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes