डॉ. डी. वाय.पाटील जुनिअर कॉलेज संघाला महापालिका बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद
schedule29 Aug 24 person by visibility 306 categoryक्रीडा
कोल्हापूर : डॉ. डी. वाय.पाटील जुनिअर कॉलेज मुलींच्या संघाने शालेय शासकीय जिल्हास्तरीय( महापालिका) शासकीय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत १९ वर्षा खालील गटात प्रथम क्रमांक पटकावला .या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या संघात आदिती नरके, राधिका काणे ,हुदा कापडी, मुग्धा पाटील, भार्गवी तोडकर यांचा समावेश आहे. या संघाने उपांत्य फेरीत कमला कॉलेज संघावर आणि अंतिम फेरीत विवेकानंद कॉलेजच्या संघावर विजय मिळविला.
विजयी संघाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, अशोकराव देसाई, प्राचार्य ए. बी. पाटील यांचे प्रोत्साहन आणि जिमखाना विभाग प्रमुख प्रा. सुदर्शन पोवार यांचे मार्गदर्शन लाभले.