डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटला गुणवंतांची पसंती; विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांमुळे मिळाले प्राधान्य
schedule29 Jul 25 person by visibility 961 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला (पॉलिटेक्निक) उच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नियमितपणे दक्ष असल्याने इन्स्टिट्यूटला विद्यार्थी आणि पालकांची पसंती मिळाली. तंत्रशिक्षण संचालनालय,मुंबई यांचेमार्फत सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्षामध्ये प्रवेश निश्चित केला आहे. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे उत्साही स्वागत करून या विद्यार्थ्यांचा सन्मान संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी यांच्या हस्ते करण्यात आला.
कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये श्रावणी महेश माने (97.60%), सानिका रामराव पाटील (95.00%), संचिता मारुती नलवडे (93.80%), आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंगमध्ये तनिष्का महेश पाटोळे
(96.20%), श्रेया रणजीत साळवी (95.80%), ऋग्वेदी अमित धूपद (95.80%), चिन्मय विठ्ठल कवडे (94.80%),सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये वैष्णवी संभाजी पडळकर (94.20%), क्षितिज धनाजी पाटील (86.80%), इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रणाली नितीन गावडे(91.20%), अंकिता दिनकर गावडे (90.40%),मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये विराज राजाराम चव्हाण (84.20%) अशा अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटमधून उत्तम इंजिनिअरिंग करिअर होईल असा विश्वास व्यक्त करून प्रवेश निश्चित केला.
इन्स्टिट्यूटमधील उत्कृष्ट शैक्षणिक दर्जा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची कार्यक्षम अंमलबजावणी, सॉफ्ट स्किल प्रशिक्षण, अत्याधुनिक प्रयोगशाळा, इंडस्ट्री- इन्स्टिट्यूट सामंजस्य करार, नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटस, नाविन्य आणि संशोधन यांवर भर, स्पर्धात्मक शैक्षणिक वातावरण, विविध शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थीकेंद्रित 'आउटकम बेस्ड एज्युकेशन', राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन वगैरे अनेक घटकांच्या यशस्वी संयोजनातून इन्स्टिट्यूटने सातत्याने गुणवत्ता उंचावत नेली आहे. औद्योगिक, सेवा आणि कार्पोरेट क्षेत्रांमध्ये आवश्यक असणारे प्रत्यक्ष ज्ञान व कौशल्य आणि नवीन तंत्रज्ञान यांसाठी आवश्यक कुशलता असणारे जॉब-रेडी अभियंते घडविण्यासाठी इन्स्टिट्यूट अखंडपणे कार्यरत आहे. नवउद्योजकता आणि स्वयंरोजगार या माध्यमातून विद्यार्थ्यांचे करिअर घडावे यासाठी विविध प्रशिक्षण उपक्रम राबविले जातात. सरकारी सेवांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी विशेष लक्ष देण्यात येते.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. स्वागत तथा सन्मानप्रसंगी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे, प्रशासकीय अधिकारी अमित आवाड, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. इन्स्टिट्यूटमध्ये अगदी मोजक्याच जागा प्रवेशासाठी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी विलंब न करता प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संचालक भिर्डी यांनी केले आहे.