अण्णा भाऊ साठे यांची शिवाजी विद्यापीठात जयंती
schedule01 Aug 25 person by visibility 264 categoryसामाजिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आज लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीमध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजिस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, इंग्रजी अधिविभागाचे डॉ. प्रभंजन माने, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ. राजश्री बारवेकर, गणित अधिविभागाचे डॉ. मच्छिंद्र गोफणे, उपकुलसचिव गजानन पळसे, डॉ. प्रमोद पांडव, डॉ. उत्तम सकट यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.