SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर बसपॅनकार्ड क्लब गुंतवणूकदारांचा पैसा परत करण्याबाबत कायदेशीर प्रकिया पूर्ण कराव्यातकोल्हापुरात वाहतूक शाखेतर्फे कर्तव्यदक्ष पोलिसांचा सत्कारमॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्जासाठी ‘महाडिबीटी’वर अर्ज प्रक्रिया सुरु; नवीन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जून जून-जुलै 2025 च्या 10 वी, 12 वी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्धशिवाजी विद्यापीठाच्या वतीने रायगडावर स्वच्छता मोहीम‘गोकुळ’च्या दुग्ध व्यवसायातील यशामुळे सहकार चळवळ सक्षम... : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापुरात बुलबुले कुटुंबियांची बेकायदेशीर पाळीव मांजरे जप्त; कारवाई दरम्यान मांजराने कर्मचाऱ्याचा घेतला चावा कोल्हापूर शहराला गुरुवारपासून पुर्ववत पाणी पुरवठा; महापालिकेच्यावतीने 21 टँकरद्वारे 63 फे-याकोल्हापूर शहरामध्ये 12524 नागरीकांची तपासणी

जाहिरात

 

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या डॉ. जयवंत गुंजकर यांची इंडियन केमिकल सोसायटीकडून लाइफ फेलो म्हणून निवड

schedule10 Jun 25 person by visibility 252 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संशोधक डॉ. जयवंत एल. गुंजकर यांची ‘इंडियन केमिकल सोसायटीच्यावतीने लाइफ फेलो’ म्हणून निवड झाली आहे. पदार्थ विज्ञान आणि अतिसूक्ष्म संकरित पदार्थ या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे ही निवड करण्यात आली आहे. 

इंडियन केमिकल सोसायटी ही विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधे प्रगती साधण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेली हि संस्था असून प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. जी. डी. यादव हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. पुरस्कारप्राप्त डॉ. जे. एल. गुंजकर याना विद्यापीठाचे रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे याचे मार्गदर्शन लाभले.

डॉ. जे. एल.  गुंजकर हे डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च’ मधे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. कोल्हापूर मधील शिवाजी विद्यापीठातून त्यांनी प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकशास्त्र विषयामध्ये पीएच. डी. प्राप्त केली. गेली १५ वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रामधे उच्चस्तरीय संशोधन करत असताना त्यांनी राष्ट्रीय वा अंतरराष्ट्रीय पातळीवर ८५ शोधनिबंध, ७ पेटंट प्रसिध्द केले आहेत.  त्यांच्या  मार्गदर्शनाखाली ६ विद्यार्थाना पीएच. डी. प्राप्त केली असून  सध्या त्यांच्याकडे ६ विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांमधे संशोधन करत आहेत. 

या निवडीबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे यांनी अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes