SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
टीकेआयईटी पश्चिम महाराष्ट्रातील उत्कृष्ट इन्स्टिट्यूट२० लाखांची मागणी, कोल्हापुरात माहिती अधिकार कार्यकर्ता जयराज कोळीला खंडणी घेताना अटकNEET, IIT-JEE व MHT-CET च्या परीक्षांमध्ये आयआयबी कोल्हापूरचा सर्वोत्कृष्ट निकालअत्याधुनिक सक्शन कम जेटींग वाहनाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पणडीकेटीई येथे जहागिरदार श्रीमंत स्व. आबासाहेब उर्फ गोविंदराव नारायणराव घोरपडे (सरकार) जयंतीनिमित्त अभिवादनकोल्हापुरातील कर्तृत्व सामाजिक संस्थेतर्फे सरनाईक कॉलनी, शिवोदय कॉलनी, द्वारकामाई नगर भागात पाण्याची व्यवस्था करण्याची मागणीनेहरू हायस्कूलमध्ये माजी शालेय समिती चेअरमन हाजी जमीर बागवान यांना श्रद्धांजलीसर्वेश पोतदार बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यलक्ष्मीपुरीतील एस एस अग्रवाल अँड सन्स दुकानातून सहा हजार किलो प्लास्टिक जप्तभारतीय जनसंघाचे संस्थापक, राष्ट्रनिष्ठ विचारवंत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनम्र अभिवादन

जाहिरात

 

डॉ. विलास. व्ही. कारजिन्नी, वारणा विद्यापीठ यांना सांगली अचिव्हर्स अवॉर्ड्स २०२५ पुरस्कार

schedule23 Jun 25 person by visibility 589 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : श्री वारणा विभाग शिक्षण मंडळांचे, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रा. डॉ. विलास. व्ही. कारजिन्नी यांना लाईफटाईम कॉन्ट्रीब्युशन टू हायर एज्युकेशन लीडरशिप इन इंडिया (‘Lifetime Contribution to Higher Education Leadership in India’) या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘सांगली अचिव्हर्स अवॉर्ड्स २०२५’ हा सन्मान सांगली येथे एका भव्य दिव्य कार्यक्रमात पार पडला. श्री वारणा विविध उद्योग शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनय कोरे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. 

या विशेष सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अभिजीत खांडकेकर यांच्या हस्ते डॉ. कारजिन्नी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन व प्रभावी योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

हा कार्यक्रम दैनिक भास्कर ग्रूपच्या 104.8 MY FM या लोकप्रिय एफएम रेडिओ वाहिनीने आयोजित केला होता.

डॉ. कारजिन्नी यांच्या नेतृत्वाखाली अनेक राष्ट्रीय स्तरावरील उच्च शैक्षणिक संस्थांनी शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, नॅक, एनबीए नवकल्पना आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामगिरीचीच राष्ट्रीय पातळीवर दखल घेत हा सन्मान त्यांना देण्यात आला. आतापर्यंत त्यांनी गेल्या ४० वर्षापासून ते वेगवेगळ्या नेतृत्वाच्या भूमिकेत कामगिरी बजावत आहेत. बेळगाव, राजम हेआंध्रप्रदेश, चिकोडी, वारणानगर, कोल्हापूर आणि मैसूर या विविध शहरांमध्ये त्यांनी विविध प्रतिष्ठित संस्थांमध्ये अधिष्ठाता, प्राचार्य, संचालक, कार्यकारी संचालक आणि कुलगुरू या महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. 

या पुरस्काराचे श्रेय डॉ. कारजिन्नी यांनी श्री वारणा विविध उद्योग शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनय कोरे, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे विविध पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक व प्राध्यापिकेतर कर्मचारी यांना दिले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes