कोल्हापुरातील कर्तृत्व सामाजिक संस्थेतर्फे सरनाईक कॉलनी, शिवोदय कॉलनी, द्वारकामाई नगर भागात पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी
schedule23 Jun 25 person by visibility 286 categoryसामाजिक

कोल्हापूर : येथील कर्तृत्व सामाजिक संस्थेतर्फे कोल्हापुरातील सरनाईक कॉलनी, शिवोदय कॉलनी, द्वारकामाई नगर या भागात पाण्याची व्यवस्था करण्याबाबतचे निवेदन कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांना देण्यात आले.
कोल्हापुरातील सानेगुरुजी वसाहत मध्ये, देशमुख हायस्कुल नजीक मातोश्री प्रमिला सरनाईक पार्क, शिवोदय कॉलनी, द्वारकामाई नगर या भागात १०० हुन आधिक परिवाराची वस्ती आहे. हा भाग महानगरपालिकेच्या हद्दीत येत असून इथे आज तागायत पाण्याची कोणतीही व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे येथील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
नियमाप्रमाणे घर फाळे आकारले जात असून पाण्यासारखी मूलभूत सुविधा अजूनही मिळत नाही आहे, अशी माहिती कर्तृत्वेचे संस्थापक विराज सरनाईक यांनी प्रशासक के. मंजूलक्ष्मी याना दिली.
तरी लवकरात लवकर पाण्याची पाईप लाईन टाकून येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लावावा अशा मागणीचे निवेदन कर्तृत्व तर्फे प्रशासक, याना देण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विराज सरनाईक, विनीत जिरगे, प्रतीक हेगिष्ट्ये, संजय जाधव, मयुरी पाटील, मंजिरी दाणी, अनुराग गोळे, शिवाजी यादव, तेजस पाटील, बापू पंडित, आदी उपस्थित होते.