विदर्भ, मराठवाड्यात भूकंपाचे धक्के; हिंगोली, परभणी, नांदेडमध्येही जाणवले हादरे
schedule10 Jul 24 person by visibility 383 categoryराज्य

मुंबई : विदर्भ मराठवाड्यात आज बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. वसमत (जि. हिंगोली) बुधवारी सकाळी ७.१५ च्या दरम्यान भूकंपाचा धक्का बसला. वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) येथे भूकंपाचे केंद्र असल्याचे समजते. तसेच मोठा भूकंप असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.
हिंगोली शहरासह जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा, वसमत, दांडेगाव, पांगरा शिंदे, वारंगा, कुरूंदा, कवठा व इतर अनेक भागांमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला. वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे, वापटी, परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले
मराठवाड्यातील नांदेड तसेच जालना जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के बसले आहेत. नांदेड जिल्ह्यात सकाळी 7.15 वाजता हे धक्के जाणवले. तर जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, परतूर तालुक्यातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.