SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
रोजगार महाकुंभ मेळाव्याचे 29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात आयोजनअमृतच्या माध्यमातून उद्योजकांसाठी भव्य प्रदर्शन व विक्रीमहसुली दावे तडजोडीने निकाली काढण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडकोरे अभियांत्रिकीत अंतर्गत हॅकाथॉन स्पर्धा उत्साहातइतिहासातील गायब झालेले ११ दिवस...जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता कार्यालय पुण्याला हलवू नये; सतेज पाटील यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांच्याकडे मागणीगोकुळ शिरगांव एमआयडीसीत कंपनीतून कार्बाइड इन्सर्ट व घरफोडीचा माल चोरी करणारे दोन आरोपी जेरबंदकोल्हापुरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई!कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते प्रारंभकोरे आर्किटेक्चर व शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रेविट कार्यशाळा संपन्न

जाहिरात

 

रोजगार महाकुंभ मेळाव्याचे 29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात आयोजन

schedule02 Sep 26 person by visibility 54 categoryराज्य

कोल्हापूर : येत्या २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण राज्यात रोजगार महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये सुमारे 18 ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे .

 या रोजगार मेळाव्याच्या सुयोग्य व प्रभावी नियोजनाकरिता कोल्हापूर जिल्हा रोजगार मेळावा समन्वय समितीची शिवाजी तंत्रनिकेतन विद्यालय येथे आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती .

या बैठकीत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम म्हणाले , राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन हा राज्य शासनाचा अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम असून या महाकुंभ मेळाव्याला अधिकाधिक युवकांनी आपला सहभाग नोंदवावा यासाठी संबंधितांनी प्रयत्न करावेत. या मेळाव्याच्या अनुषंगाने शुक्रवार 4 सप्टेंबर रोजी गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग येथे कोल्हापूर इंजीनियरिंग असोसिएशन , स्मॅक , त्याचबरोबर मॅक आणि गोशीमा यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील पात्रता धारक युवकांनी मोठ्या संख्येने या रोजगार मेळाव्यासाठी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहनही श्री करीम यांनी यावेळी केले.

 या आढावा बैठकीसाठी जिल्हास्तरीय रोजगार मेळावा समितीचे अध्यक्ष संजय पेंडसे , जिल्हास्तरीय रोजगार मेळावा समितीचे सदस्य सर्वश्री हरिश्चंद्र धोत्रे ,भरत सोमय्या, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वाय.बी पाटील,कोल्हापूर आयटीआय प्राचार्य श्री आवटी , MIDC चे जे.ए वावरे, जिल्हा उद्योग अधिकारी बालाजी बिराजदार,कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन सचिव प्रशांत मोरे,गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन सचिव कृष्णात सावंत,कामगार आयुक्त कार्यालयाचे बी.डी धरमकर आणि कौशल्य विकास उद्योजकता रोजगार मार्गदर्शन अधिकारी सारंग कापूरकर आदी उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes